स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले बदलू शकतात तुमचे जीवन, पतंजलीकडून जाणून घ्या कसं?

बाबा रामदेव यांच्या 'द सायन्स ऑफ आयुर्वेद' या पुस्तकात स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या औषधी गुणधर्मांचा उल्लेख करण्यात आला आहे. कोणत्या मसाल्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

स्वयंपाकघरातील हे मसाले बदलू शकतात तुमचे जीवन, पतंजलीकडून जाणून घ्या कसं?
baba ramdev
| Updated on: Jul 04, 2025 | 9:45 PM

स्वयंपाकघरातील मसाले आपल्या जेवणाची चव वाढवण्याचे काम करतात, मात्र हे मसाले आरोग्यासाठीही फायजेशीर ठरु शकतात. पतंजली आयुर्वेदानुसार हळद, दालचिनी, लवंग, काळी मिरी हे मसाले रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आपल्या शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकतात. बाबा रामदेव यांच्या ‘द सायन्स ऑफ आयुर्वेद’ या पुस्तकात स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या औषधी गुणधर्मांचा उल्लेख करण्यात आला आहे. कोणत्या मसाल्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

काळी मिरी

खोकला येत असेल तर 2-3 काळी मिरी चघळून खाल्यास तो बरा होतो, तसेच शांत झोप लागते. ईलच, झोपेची गुणवत्ता सुधारण्यासही मदत होते. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर 4-5 काळी मिरींची पावडर बनवा आणि गरम तुपासोबत घ्या, यामुळे पित्तापासून आराम मिळेल. 20 ग्रॅम काळी मिरी, 100 ग्रॅम बदाम आणि 150 ग्रॅम क्रिस्टल शुगर एका बाटलीत साठवा आणि गरम दूध किंवा पाण्यासोबत सेवन करा, यामुळे खोकला कमी होईल.

वेलची

तोंड आले असेल तर वेलची पावडर घ्या आणि त्यात मध मिसळा आणि ते खा. यामुळे जखम हळूहळू कमी होऊ लागतात. जर लघवीची समस्या असेल तर वेलची पावडर आणि क्रिस्टल शुगर मिसळा आणि त्याचे सेवन करा.

दालचिनी

दालचिनी ही अँटीसेप्टिक आणि डिटॉक्सिफायिंग औषधी वनस्पती आहे. यामुळे पचन सुधारते आणि सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. दालचिनी, आले आणि लवंग मिसळून एक काढा बनवा आणि तो प्या, यामुळे वात आणि कफ विकार कमी होतो. तसेच शरीरात उर्जा संचारते.

लवंग

तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर लवंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 4-5 ग्रॅम लवंग पावडर पाण्यात मिसळा आणि कपाळावर लावा, यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो. 2-3 लवंग चावून खाल्ल्यास खोकला कमी होतो. दात दुखत असेल तर लवंग पावडर आणि लवंग तेल मिसळा यामुळे वेदना कमी होतात.

जिरी

दही किंवा लस्सीमध्ये जिरे पावडर मिसळून प्यायले तर ते जुलाब आणि पोटाच्या समस्या कमी होतात. 400 मिली पाण्यात 5-7 ग्रॅम जिरे पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. हे पाणी पिल्यास आतड्यांसंबंधी समस्या कमी होतात.

मेथी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथीचे दाणे फायदेशीर आहेत. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यावे आणि मेथीचे दाणे चावून खा, यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. मेथीचे दाणे, सुके आले आणि हळद समान प्रमाणात घेऊन त्याचे सेवन करा, यामुळे वात कमी होतो.

हिंग

हिंगामुळे दारूच्या व्यसनापासून मुक्ती मिळू शकते. पतंजलीच्या मते हिंग 4 लिटर पाण्यात उकळवा आणि अर्धे पाणी शिल्लक राहिल्यावर ते गाळून घ्या. दररोज जेवणाच्या अर्धा तास आधी हे पाणी प्या. यामुळे दारू पिण्याची इच्छा कमी होते.

हळद

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर करू शकता. यामुळे पायोरियाची समस्याही दूर होते, यासाठी हळद, मीठ आणि मोहरीच्या तेलाने दातांची मालिश करा. काही दिवसांतच फरक जाणवेल. तसेच खोकला-सर्दी, शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्यासही हळद फायदेशीर आहे.

लसूण

हृदयरोगासाठी लसून फायदेशीर आहे. यासाठी लसणाच्या 3-4 पाकळ्या कापून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्या पाण्याचे सेवन करा. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

लिंबू

चेहऱ्यावरील मुरुम घालवण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे. यासाठी लिंबू आणि मध मिसळा आणि मुरुमांवर लावा, लवकर फरक पडेल. तसेच एखाद्या व्यक्तीला मेट्रोरेजिया किंवा मूळव्याधची समस्या असेल तर सकाळी रिकाम्या पोटी एक कप कोमट दूध घ्या आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस घाला आणि लगेच प्या, यामुळे आराम मिळेल.