AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डुकराचे की कुत्र्याचे, चीनचे लोक सर्वात जास्त कोणत्या प्राण्याचे मांस खातात?

चीनमधील खाण्यापिण्याच्या सवयींची चर्चा नेहमीच होते. पण तिथे सर्वात जास्त कोणत्या प्राण्याचे मांस खाल्ले जाते, हे अनेकांना माहीत नसते. चला, चीनमध्ये डुकराचे मांस जास्त खाल्ले जाते की कुत्र्याचे, याबद्दल जाणून घेऊया.

डुकराचे की कुत्र्याचे, चीनचे लोक सर्वात जास्त कोणत्या प्राण्याचे मांस खातात?
Mutton
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: बापू गायकवाड | Updated on: Aug 05, 2025 | 11:35 PM
Share

चीनमधील खाण्यापिण्याच्या सवयींची चर्चा नेहमीच होते. चीन आपल्या अनोख्या फूड पॅटर्नसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथील लोक विंचू, साप आणि विविध प्रकारचे समुद्री जीव खातात, हे आपण ऐकले आहे. तसेच, तिथे डुकराचे आणि कुत्र्याचे मांसही खाल्ले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, चीनमध्ये सर्वात जास्त कोणत्या प्राण्याचे मांस खाल्ले जाते? चला, चीनमध्ये डुकराचे मांस जास्त खाल्ले जाते की कुत्र्याचे, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

चीनमध्ये सर्वात जास्त खाल्ले जाणारे मांस

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चीनमध्ये सर्वात जास्त खाल्ले जाणारे मांस डुकराचे मांस (pork) आहे. चीनमधील लोक डुकराचे मांस खायला जास्त पसंत करतात. एका अहवालानुसार, चीनमध्ये तब्बल पंचावन्न टक्के लोक डुकराचे मांस खातात, तर त्यानंतर सत्तावीस टक्के लोक चिकन खातात. डुकराचे मांस केवळ चीनमध्येच नाही, तर जगभरात सर्वाधिक खाल्ले जाते. जगभरात सुमारे छत्तीस टक्के लोक पोर्कचे सेवन करतात. चीनमध्ये अनेक सण-उत्सवांमध्येही पोर्कचा वापर केला जातो, ज्यामुळे त्याची मागणी खूप जास्त असते.

डुकराच्या मांसाची मागणी जास्त का आहे?

चीनमध्ये डुकराचे मांस सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध होते. ते नरम आणि चविष्ट असल्यामुळे अनेक प्रकारे शिजवता येते, ज्यामुळे त्याची मागणी आणि वापर दोन्ही जास्त आहे. चीनमध्ये पोर्कची लोकप्रियता इतकी आहे की, त्याची खपत लाखो टनांमध्ये होते. यामुळे तेथील लोकांच्या रोजच्या आहारात पोर्कला एक महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

कुत्र्याच्या मांसाची स्थिती आणि भारतातील खाण्याच्या सवयी

चीनमध्ये कुत्र्याचे मांसही खाल्ले जाते, पण पोर्कच्या तुलनेत ते खूप कमी प्रमाणात वापरले जाते. अनेक ठिकाणी रस्त्यावरील दुकानांवर कुत्र्याचे मांस शिजवले किंवा विकले जात असल्याचे दिसते, पण त्याची एकूण खपत पोर्कच्या तुलनेत कमी असून काही दशलक्ष टनांपर्यंतच मर्यादित आहे.

जगभरात बहुतांश लोक मांसाहारी असले, तरी भारतातील परिस्थिती वेगळी आहे. भारतात मांसाहाराचे प्रमाण हळूहळू वाढत असले, तरी आजही धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतांमुळे अनेकजण शाकाहाराला प्राधान्य देतात. भारतात सुमारे अठ्तीस टक्के लोक शाकाहारी आहेत, तर सुमारे अठरा टक्के लोक मांसाहारी आहेत.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं