AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बटाटा आणि केळीची साल, अनेक रोगांवर गुणकारी औषध, वाचा अधिक…

आपल्यापैकी भवतेक लोक फळांचे सेवन करून साल फेकून देतात. मात्र, फळांच्या साल आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खू फायदेशीर असतात.

बटाटा आणि केळीची साल, अनेक रोगांवर गुणकारी औषध, वाचा अधिक...
बटाटा आणि केळीची साल
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 11:46 AM
Share

मुंबई : आपल्यापैकी भवतेक लोक फळांचे सेवन करून साल फेकून देतात. मात्र, फळांच्या साल आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. विशेष म्हणजे हे साल आपल्याला अनेक रोग्यापासून दूर ठेवण्यास मदत करतात. बटाट्याच्या सालीत कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी कॉम्पलेक्ससोबतच आयर्न देखील भरपूर असते. या सालीतील हेच घटक शरीरातील अनेक कमतरता दूर करतात. त्यामुळे अनेक आजार आपल्यापासू दूर राहतात. (Potato and banana peel are beneficial for health)

वजन कमी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाबासारख्या अनेक व्याधींवर गुणकारी बटाट्याची साल आहे. बटाट्याच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटामिन असल्याने, त्याच्या सेवनाने हाडांना मजबुती मिळते. व्हिटामिन बीमुळे शरीराला ताकद आणि दिवसभराची ऊर्जा मिळते. त्यामुळे शक्य तेवढ्या वेळा बटाटा हा सालीसकट खाण्याचा प्रयत्न करावा. बटाट्याच्या सालीचा आहारात समावेश करण्यासाठी आपण बटाट्याची साल बारीक करून खाऊ शकतो. यासाठी बटाट्याची साल ताजी किंवा वाळलेली असली तरी चालते.

केळीची साल आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीचा सालीचा आहारात समावेश करण्यासाठी आपण सर्वात अगोदर केळीची साल स्वच्छ धुवून घा. एक ग्लास पाणी गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये केळीची साल घाला आणि दहा मिनिटे हे पाणी चांगले उकळा आणि नंतर हे पाणी प्या. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. आपण केळीची साल मिक्सरमध्ये बारीक करून देखील आहारात घेऊ शकतो. दररोज सकाळी केळीच्या सालीची पावडर पाण्यात मिक्स करून पिल्याने आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते.

यामुळे केळीच्या सालचा आहारात समावेश हा केला पाहिजे. बटाट्यात मोठ्या प्रमाणात फायबर घटक असतात. यामुळे आपली पचनशक्ती देखील मजबूत होऊ शकते. यामध्ये फायबर अधिक असल्याने पोटाचे विकार देखील होत नाहीत. बद्धकोष्ठतेची समस्या देखील नाहीशी होते. त्यामुळेच बटाट्याची साल खूपच गुणकारी असल्याचे म्हटले जाते. बटाट्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. यामुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ती भरून निघते. म्हणून आपण बटाट्याच्या सालीचा जेवणात जरुर वापर करावा.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Obesity | नेहमीपेक्षा 15 मिनिटही कमी झोप वाढवू शकते लठ्ठपणाची समस्या, निर्माण होऊ शकतो रक्तदाबाचा धोका!

(Potato and banana peel are beneficial for health)

Follow Us
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला