AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cholesterol | खराब कोलेस्ट्रॉलच नाही, तर चांगले कोलेस्ट्रॉल देखील निर्माण करू शकते हृदयविकाराचा धोका!

सामन्यतः कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकारचे असते एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल अर्थात HDL आणि दुसरे खराब कोलेस्ट्रॉल अर्थात LDL.

Cholesterol | खराब कोलेस्ट्रॉलच नाही, तर चांगले कोलेस्ट्रॉल देखील निर्माण करू शकते हृदयविकाराचा धोका!
कोलेस्ट्रॉल
| Updated on: Mar 02, 2021 | 2:26 PM
Share

मुंबई : सामन्यतः कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकारचे असते एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल अर्थात HDL आणि दुसरे खराब कोलेस्ट्रॉल अर्थात LDL. आपणसुद्धा बर्‍याचदा ऐकले असेल की, चांगले कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि हृदयरोग तसेच आजारांपासून बचाव करून आरोग्य राखण्यासही ते उपयुक्त आहे. तथापि, स्पेनमध्ये झालेल्या एका नवीन संशोधनात संशोधकांना असे आढळले आहे की, सर्व चांगले कोलेस्ट्रॉल निरोगी नसते आणि खराब कोलेस्ट्रॉलसारखे त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात (Not only bad cholesterol but also good cholesterol can cause heart disease).

चांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी फायदेशीर!

मेटाबोलिझम, क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल या जर्नलमध्ये प्रकाशित झालेला हा आभास स्पेनच्या हॉस्पिटल डेल मार मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केला होता. अशी अनेक औषधे उपलब्ध आहेत, जी खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करतात. परंतु, जी औषधे चांगली कोलेस्ट्रॉल वाढवतात, ती हृदयरोग कमी करण्यास देखील प्रभावी आहेत, हे अद्यापपर्यंत सिद्ध केले गेले नाही.

LDL vs HDL कोलेस्ट्रॉल

या विरोधाभासामुळे, चांगले कोलेस्ट्रॉल आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमध्ये काय संबंध आहे हे शोधण्यासाठी संशोधकांनी हा अभ्यास केला. चांगले कोलेस्टेरॉल म्हणजे HDL कोलेस्ट्रॉल (high-density lipoprotein cholesterol) हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून साठवलेले कोलेस्ट्रॉल शरीरातून काढून यकृताकडे नेते. तर, त्याच वेळी बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL (low -density lipoprotein cholesterol) रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉल गोठवण्याचे काम करते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो (Not only bad cholesterol but also good cholesterol can cause heart disease).

हृदयविकाराचा धोका कोलेस्ट्रॉल कणांच्या आकारावर आधारित

अभ्यासादरम्यान, संशोधकांनी अनुवांशिक वैशिष्ट्यांचे विश्लेषण केले, जे चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या कणांचे आकार निर्धारित करते. नंतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग ‘मायोकार्डियल इन्फ्रक्शन’च्या जोखमीसह त्याचे संबंध तपासले. याचा परिणाम असा झाला की, चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या मोठ्या कणांचे अनुवांशिक वैशिष्ट्य थेट हृदयविकाराच्या उच्च जोखमीशी संबंधित असते. तर, चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या लहान कणांशी संबंधित अनुवांशिक वैशिष्ट्ये हृदयविकाराच्या झटक्याच्या कमी जोखमीशी संबंधित असतात.

हृदयविकाराचा धोका आणि चांगला कोलेस्ट्रॉल यांच्यात थेट संबंध

या अभ्यासाचे मुख्य अन्वेषक डॉ. रॉबर्ट इलोसोवा म्हणतात, ‘चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या कणांचे आकार आणि त्यांचा हृदयविकाराच्या धोक्याच्या जोखमीमध्ये थेट संबंध आहे. अशा परिस्थितीत आपण आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे, परंतु त्यांच्या कणांचे आकार नेहमीच लहान असले पाहिजे, मोठे नाही.’ ऑलिव ऑईल, संपूर्ण धान्य, चरबीयुक्त मासे, आळशीचे बियाणे, शेंगदाणे, सब्जा बिया, डाळी व शेंगा, उच्च फायबरयुक्त फळे इत्यादी ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ असणारे पदार्थ आहेत.

(टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

(Not only bad cholesterol but also good cholesterol can cause heart disease)

हेही वाचा :

Obesity | नेहमीपेक्षा 15 मिनिटही कमी झोप वाढवू शकते लठ्ठपणाची समस्या, निर्माण होऊ शकतो रक्तदाबाचा धोका!

Healthy Eating |  काम करत जागण्यामुळे रात्री भूक लागतेय? मग, नक्की खा ‘हे’ लेट नाईट स्नॅक्स

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.