तुमच्या मुलांना मधुमेहापासून वाचवण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात, कधीच पडणार नाहीत आजारी
आजकाल लहान मुलांमध्येही मधुमेहाची समस्या वाढत आहे. पूर्वी हा आजार मोठ्यानंमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत होता, परंतु आता त्याचा परिणाम लहान मुलांवरही दिसून येत आहे. पालकांनी या गोष्टींकडे लक्ष दिल्यास हे मधुमेहाचा आजार टाळता येऊ शकते.

आजवर मोठ्यांना होणारा मधुमेह आता लहान मुलांना देखील होत आहे. भारतात हा आजार मुलांमध्ये झपाट्याने वाढत असल्याने चिंतेची बाब ठरतेय. इतक्या लहान वयातच अशा आजारांना या मुलांना सामोरे जावे लागत आहे. लहान वयातच मधुमेह झाल्यामुळे लठ्ठपणा, किडनी आणि यकृताच्या समस्या आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत सर्व पालकांना मुलांमध्ये मधुमेहाच्या वाढत्या प्रकरणांची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. मधुमेहाची कारणे आणि लक्षणे जाणून घेतल्यावरच पालक आपल्या मुलांना या आजारापासून वाचवण्यासाठी मदत करू शकतात. यासाठी ज्या मुलांना मधुमेह आहे अशा प्रत्येक पालकांनी या 5 गोष्टी लक्षात ठेवल्यास हा मुलांचा हा आजार टाळता येईल. चला जाणून घेऊयात…
जास्त जंक फूड आणि गोड खाण्याची सवय
प्रत्येक लहान मुलं हे घरातील घरातील सकस आहार खायचं सोडून बाहेर मिळणारे फास्ट फूड आणि पॅक केलेले स्नॅक्स खाण्यास जास्त प्राधान्य देत असतात. पिझ्झा, बर्गर, चिप्स, चॉकलेट, कोल्ड्रिंक्स आणि पॅकेज्ड ज्यूसमध्ये भरपूर साखर आणि अस्वास्थ्यकर फॅट असते, ज्यामुळे शरीरातील इन्सुलिन हळूहळू कमकुवत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
खेळांचा अभाव
पूर्वीच्या काळी लहान मुलं बहुतेक वेळा बाहेर मैदानी खेळ खेळताना दिसायचे. परंतु आताची लहान मुलं मोबाईल फोन, टीव्ही आणि व्हिडिओ गेम्समध्ये इतके व्यस्त झाले आहेत की शारीरिक हालचाली खूप कमी झाल्या आहेत. जेव्हा शरीर योग्यरित्या सक्रिय नसते तेव्हा फॅट जमा होऊ लागते आणि शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
लठ्ठपणा
जर मुलाचे वजन जास्त असेल तर त्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा शरीरात जास्त प्रमाणात फॅट जमा होऊ लागते तेव्हा इन्सुलिन नीट काम करत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. विशेषत: पोटाभोवती फॅट वाढल्याने हा धोका आणखी वाढतो.
मधुमेह अनुवंशिक असणे
आई-वडील किंवा आजी-आजोबांपैकी कोणाला मधुमेह असेल तर मुलांमध्येही तो होण्याची शक्यता वाढते. मात्र अशा प्रत्येक मुलाला मधुमेह असेलच असे नाही, पण आहार आणि जीवनशैली योग्य नसेल तर हा आजार लवकर होण्याची शकता असते. त्यामुळे ज्यांच्या घरात आधीच काही लोकांना मधुमेह आहे त्यांनी आपल्या मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
तणाव आणि कमी झोप
मुलांवर अभ्यासाचा ताण, जास्त स्क्रीन टाइममुळे झोप न लागणे आणि तणाव ही देखील मधुमेहाची प्रमुख कारणे बनू शकतात. जेव्हा शरीराला विश्रांती मिळत नाही किंवा मन खूप तणावाखाली राहते, तेव्हा हार्मोनल संतुलन बिघडते, ज्यामुळे चयापचय प्रभावित होते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
मुलांना मधुमेहापासून वाचवण्यासाठी सोप्या टिप्स
मुलांना आरोग्यदायी घरगुती अन्न खायला द्या आणि बाहेरचे फास्ट फूड कमी करा. दिवसातून किमान 1-2 तास मैदानी खेळ किंवा शारीरिक हालचालींना प्रोत्साहन द्या. गोड पदार्थ आणि कोल्ड्रिंक्सची सवय हळूहळू कमी करा. त्यांच्या झोपेची काळजी घ्या आणि स्क्रीन टाइम मर्यादेत ठेवा. कुटुंबात मधुमेह असल्यास वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी करून घ्या. मुलांमध्ये सुरुवातीपासूनच आरोग्यदायी सवयी लावल्या तर मधुमेहासारख्या आजारांपासून त्यांचा बचाव होऊ शकतो. फक्त थोडे लक्ष देणे आवश्यक आहे.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)