पावसाळ्यात कपड्यांना वास येतोय.. मग हे 6 उपाय करा, झटक्यात…
पावसाळ्यात कपड्यांना वास येणे ही एक सामान्य समस्या आहे. हे निराकरण करण्यासाठी, हा लेख कपड्यांमधून दुर्गंधी दूर करण्याच्या सहा सोप्या आणि प्रभावी पद्धती सांगतो. यामध्ये मोकळ्या हवेत वाळवणे, अल्कोहोल आणि पाण्याचा स्प्रे, फ्रिजरचा वापर, लिंबाचा रस, कॉफी ग्राउंड्स आणि बेकिंग सोडाचा समावेश आहे. या उपायांचा वापर करून तुम्ही तुमचे कपडे सुगंधित आणि ताज्या ठेवू शकता.

पावसाळ्यात कपड्यांना वास येणं ही सामान्य गोष्ट आहे. ऊन नसल्यामुळे कपडे वाळत नाहीत. त्यात ओलसरपणा असेल तर मग विचित्र वास येतो. फ्रेगरन्स असलेल्या डिटर्जेंटने कपडे धुतले तरी वास जात नाही. त्यामुळे कपडे घालणं मुश्कील होऊन जातं. जर पावसाळ्यात कपड्यांचा वास किंवा दुर्गंधी झटक्यात दूर केली जाऊ शकते. छोट्या छोट्या उपायांनी ही दुर्गंधी दूर करता येऊ शकते. त्यासाठी आम्ही काही उपाय देत आहोत. ते नक्कीच वापरून पाहा.
मोकळी हवा आणि ऊन
कपड्याचा ओलसर किंवा दमटपणा दूर करायचा असेल तर कपडे मोकळ्या हवेत किंवा ऊन्हात वाळत घाला. त्यामुळे न धुताच कपड्यांना येणारा वास दूर होईल.
अल्कोहोल आणि पाण्याचा स्प्रे
अल्कोहोलचा स्प्रे कपड्यावर मारला तर लोक तुम्हाला दारूडा समजतील. त्यामुळे व्होडक्याला पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे कपड्यावर मारा. व्होडक्याचे तीन भाग आणि एक भाग पाण्याचा घ्या आणि मिक्स करून कपड्यावर मारा. या स्प्रेमुळे कपड्यावरील केवळ बॅक्टेरियाच मरत नाही तर कपडे सुकल्यावर त्याचा वासही निघून जातो.
फ्रिजरमध्ये टाका
ही आयडिया थोडी यूनिक आहे. ओल्या कपड्यातून वास येत असेल तर फ्रिजरमध्ये टाका. एखाद्या प्लास्टिक बॅगेत ठेवून कपडे फ्रिजरमध्ये ठेवा. काही तासानंतर बाहेर काढा. कमी तापमानामुळे कपड्यांचा येणारा वास दूर होतो.
लिंबाच्या रसात…
पाण्यात लिंबाचा रस टाकून कपड्यात भिजवा. त्यामुळे कपड्यांवरील बॅक्टेरिया मरेल आणि कपड्यातून वासा ऐवजी सुगंध येईल.
कॉफी ग्राऊंडचा वापर…
फिल्टर कॉफीच्या उरलेल्या कॉफी ग्राउंड्सला कपड्यांची दुर्गंधी घालवण्यासाठी वापरा. प्लास्टिक बॅगेत कॉफी ग्राऊंडसोबत कपड्यांना टाका. सकाळी कपडे प्लास्टिक बॅगेतून काढा आणि वाळत गाला. संपूर्ण दुर्गंधी दूर होईल.
बेकिंग सोडा
कपड्याची दुर्गंधी घालवण्यासाठी बेकिंग सोड्याचा सर्रासपणे आणि प्रचंड वापर केला जातो. कपड्यांची दुर्गंधी दूर करण्यासाठी पाण्यात बेकिंग सोडा टाकून कपडे भिजवा. नंतर कपडे वाळत घाला. दुर्गंधी दूर होईल.
