AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakshabandhan 2022: ‘रक्षाबंधना’ ला चेहऱयावर झटपट चमक येण्यासाठी वापरून पहा हा ‘हे’ ग्लोईंग स्कीन फेस पॅक!

रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्त्रिया खूप सजतात. यावेळी स्टायलिश पोशाखही घालतात. यादरम्यान महिला पार्लरमध्येही जातात. पण जर तुमच्याकडे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर, तुम्ही घरगुती फेस पॅक देखील आपल्या चेहऱयावर त्वरीत चमक आणू शकता.

Rakshabandhan 2022: ‘रक्षाबंधना’ ला चेहऱयावर झटपट चमक येण्यासाठी वापरून पहा हा ‘हे’ ग्लोईंग स्कीन फेस पॅक!
Face PackImage Credit source: Google
vanita kamble
vanita kamble | Updated on: Aug 11, 2022 | 7:55 PM
Share

रक्षाबंधन हा सण आज म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. या दरम्यान बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात. वर्षभर भाऊ-बहिणी या सणाची वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत, काही दिवसांपूर्वीपासून भाऊ आणि बहीण दोघेही एकमेकांना खास वाटण्याची तयारी सुरू (Preparation begins) करतात. अशा परिस्थितीत स्त्रियाही खूप सुंदर दिसण्याची तयारी करू लागतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्त्रिया खूप सजतात. यावेळी स्टायलिश पोशाखही घालतात. ग्लोईंग त्वचेसाठी (For glowing skin) पार्लरमध्ये जाणेही पसंत करतात. पण जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्हाला ग्लोईंग स्किन मिळवायची असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. तुम्ही घरगुती फेस पॅक देखील वापरू शकता. जाणून घ्या, कोणते घरगुती फेस पॅक (Homemade face pack ) तुम्ही ट्राय करू शकता.

एलोवेरा फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा कोरफडीचे जेल घ्या. त्यात एक चमचा मध घाला. त्यात चिमूटभर हळद घाला. त्यात गुलाबजल घाला. सर्व साहित्य एकत्र करून फेस पॅक बनवा. हा फेस पॅक चेहरा आणि मानेवर लावा. ते कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या. त्यानंतर हातांनी मसाज करून चेहरा धुवा.

केशर फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी एक भांडे घ्या. त्यात दोन चमचे दूध घ्या. त्यात केशराचे २ ते ३ थेंब टाका. थोडा वेळ भिजत ठेवा. हा फेस पॅक कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ तसाच राहू द्या. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.

चंदनाचा फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात गुलाबजल टाका. या दोन गोष्टी नीट मिसळा. हा फेस पॅक कोरडे होईपर्यंत चेहरा आणि मानेवर ठेवा. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा.

बेसन फेस पॅक

एका भांड्यात 1 टीस्पून बेसन घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि कच्चे दूध घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळा. हा फेस पॅक चेहरा आणि मानेवर लावा. काही काळ तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

पपई फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी ४ ते ५ पपईचे चौकोनी तुकडे घ्या. त्यांना चांगले मॅश करा. त्यात अर्धा चमचा चंदन पावडर घाला. त्यात गुलाबजल टाका. या सर्व गोष्टी नीट मिसळा. हा फेस पॅक चेहरा आणि मानेवर लावून राहू द्या. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर तसेच राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान