AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Relationship Tips | लग्नासाठी जोडीदार शोधताय? मग, ‘या’ गोष्टी आधी वाचा आणि लक्षात घ्या…

विवाह हा जीवनाचा एक भाग आहे, ज्याचा आनंद स्त्री-पुरुषासह त्यांच्या कुटुंबाला देखील होतो. बहुतेक लोक लग्नाबद्दल संभ्रमात असतात की, त्यांचा जोडीदार कसा असेल, त्याच्या सवयी काय असतील, कुटुंबातील सदस्यांची निवड कशी असेल आणि त्याच वेळी अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या कोणाचंही मन दुविधेत टाकू शकतात.

Relationship Tips | लग्नासाठी जोडीदार शोधताय? मग, ‘या’ गोष्टी आधी वाचा आणि लक्षात घ्या...
फेंगशुईच्या या उपायांनी लग्नातील सर्व अडथळे होतील दूर
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 3:57 PM
Share

मुंबई : विवाह हा जीवनाचा एक भाग आहे, ज्याचा आनंद स्त्री-पुरुषासह त्यांच्या कुटुंबाला देखील होतो. बहुतेक लोक लग्नाबद्दल संभ्रमात असतात की, त्यांचा जोडीदार कसा असेल, त्याच्या सवयी काय असतील, कुटुंबातील सदस्यांची निवड कशी असेल आणि त्याच वेळी अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या कोणाचंही मन दुविधेत टाकू शकतात. लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, प्रत्येक विवाहाची स्वतःची वैशिष्ट्ये आणि त्रुटी आहेत, ज्या आपल्याला काही काळानंतर कळतात (Relationship Tips Looking for a soulmate then remember these things first).

विवाहाचा निर्णय घेणे हे स्वतः एक कठीण काम आहे, परंतु जे लोक त्यांच्या जोडीदाराचा शोध घेत आहेत, त्यांच्यासाठी अशा काही टिप्स आहेत, ज्यामुळे त्यांची ही कोंडी काहीशी कमी होऊ शकेल. चला तर, मग लग्नाविषयी महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया…

लग्नासाठी योग्य जोडीदार शोधत असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

  1. रूढीवादी किंवा कमकुवत विचारांच्या लोकांपासून दूर रहा.
  2. लग्नाचा विचार करताना असा एखादा व्यक्ती निवडा की, जो नेहमी तुम्हाला प्राधान्य देईल.
  3. भांडणे किंवा वादविवाद करणाऱ्या व्यक्तीपासून नेहमीच दूर रहा.
  4. वर्चस्व गाजवायला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्न करू नका.
  5. आपले कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या मतांकडे देखील लक्ष द्या.
  6. दोघांचेही विचार समान आणि मिळते-जुळते असावेत.
  7. एकमेकांप्रती आदर असावा.
  8. तुमच्यावर विश्वास ठेवणारा व्यक्ती निवडा.
  9. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची निवड करा.
  10. आपली काळजी घेणारा आणि वैयक्तिक स्पेस देणाऱ्याला प्राधान्य द्या.

आनंदी विवाहित जीवनासाठी टिप्स :

  1. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहायला शिका.
  2. एकमेकांच्या मताचा आदर करा.
  3. आपल्या जोडीदारासह घरातील कामे शेअर करा.
  4. नेहमी एकमेकांचे कौतुक करा.
  5. एकमेकांमधील बदल स्वीकारा आणि अपेक्षा कमी करा.
  6. विवाहात विश्वास आणि निष्ठा टिकवून ठेवा.
  7. एकमेकांसोबत वेळ घालवा.
  8. जोडीदारासोबत डेटवर जा.
  9. एकमेकांना भेटवस्तू द्या.
  10. I love you म्हणायला विसरू नका!

हे लक्षात ठेवा की, विवाह दोन लोकांचे बंधन आहे, म्हणून हेच दोन लोक आपले नाते कसे हाताळायचे हे जाणतात. पण लग्नाशी संबंधित या सर्व गोष्टींची काळजी घेत, आपण आपले नाते आणखी सुधारू शकता. म्हणून, आपण लव्ह मॅरेज करत असाल किंवा अरेंज मॅरेज करत असलात, तरी आपणास या नात्याचे महत्त्व समजून घेणे आणि ते टिकवून ठेवणे महत्वाचे आहे.

(Relationship Tips Looking for a soulmate then remember these things first)

हेही वाचा :

Relationship Tips | तुमच्या जोडीदारामध्ये ‘या’ सवयी आहेत? मग, लग्नाचा निर्णय घेण्याआधी एकदा विचार कराच!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.