AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुकानदार बॉटलमध्ये पेपराचे बोळे का ठेवतात? 101 टक्के लोकांना माहीत नाही

पाण्याच्या बाटलीतून येणारा वास हा बॅक्टेरिया आणि दमट वातावरणामुळे होतो. आपण पेपर वापरून, बेकिंग सोडा, लिंबू किंवा कॉफी पावडरसह बाटलीतील दुर्गंधी कशी काढता येईल हे पाहणार आहोत. हे सर्व सोपे आणि घरगुती उपाय आहेत जे बाटली स्वच्छ आणि वासमुक्त ठेवण्यास मदत करतील.

दुकानदार बॉटलमध्ये पेपराचे बोळे का ठेवतात? 101 टक्के लोकांना माहीत नाही
दुकानदार बॉटलमध्ये पेपराचे बोळे का ठेवतात ?Image Credit source: social media
| Updated on: Jun 17, 2025 | 12:04 PM
Share

पाण्याच्या बॉटलचा रोज वापर होतो. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते नोकरीला जाणाऱ्या बाप्यांपर्यंत सर्वचजण पाण्याच्या बॉटलचा वापर करतात. कुणाकडे स्टिलची, कुणाकडे प्लास्टिकची तर कुणाकडे तांब्याची पाण्याची बॉटल असते. घरातून बाहेर शॉपिंगला जाण्यापासून ते ऑफिस, जीम किंवा प्रवासाला जाण्यासाठीही पाण्याची बॉटल वापरली जाते. पण पाण्याची बॉटल रोज वापरताना ती स्वच्छ करण्याचं आपण विसरून जातो. त्यामुळे पाण्याच्या बॉटलला दुर्गंधी येते. अनेकदा तर दुर्गंधी इतकी असते की पाण्याच्या बॉटलमधून पाणी पिण्याचं मनही होत नाही.

खरंतर पाण्याच्या बॉटलमधून येणारी दुर्गंधी ही दमट वातावरण, बॅक्टेरीया आणि बॉटल स्वच्छ न ठेवल्याने येते. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये सर्वाधिक दुर्गंधी येते. कारण त्यात मायक्रोब्स सहजपणे वाढतात आणि तळापर्यंत जाऊन बसतात. पण स्टिलच्या बॉटलमध्ये बराच काळ पाणी भरून ठेवलं आणि न धुता पाण्याच्या बॉटलचा वापर केला तर दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. याशिवाय बॉटल धुतल्यानंतर योग्य पद्धतीने सुकली नाही आणि तशीच ती बंद केली तर पुन्हा त्यात बॅक्टेरिया निर्माण होतात. पाण्याच्या बॉटलमधून दुर्गंधी दूर करण्यासाठीच दुकानदार बॉटलमध्ये पेपर ठेवतात. या पेपरसोबत आणखी काय काय ठेवलं जातं, याचीच माहिती तुम्हाला देणार आहोत.

दुर्गंधी कशी घालवाल?

पेपरच्या माध्यमातून तुम्ही पाण्याच्या बॉटलची दुर्गंधी दूर करू शकता. पेपरचे बोळे बॉटलमध्ये ठेवल्यास बॉटलमधील ओलसरपणा शोषून घेतात. त्यामुळे दुर्गंधी आणि बॅक्टेरिया शोषला जातो. पेपरच्या बोळ्यांचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया.

दुर्गंधीपासून मुक्तता मिळवण्यासाठी पेपर आणि 5-6 लवंगांची गरज पडेल. पेपर चांगल्या पद्धतीने फोल्ड करा आणि लवंगांसोबत दुर्गंधी येत असलेल्या बॉटलमध्ये टाका. त्यानंतर ही बॉटल झाकण लावून रात्रभर ठेवा किंवा चार पाच तास तशीच बंद ठेवा. सकाळी बॉटलमधील पेपर काढून टाका. पेपर आणि लवंग काढल्यानंतर पाण्याची बॉटल साध्या पाण्याने किंवा लिक्विड डिटर्जंटने धुवून काढा. आता बॉटल चांगल्या पद्धतीने सुकवून घ्या. ती हवेत ठेवा. या ट्रिकने तुमच्या बॉटलमध्ये दुर्गंधी येणार नाही.

पेपरसोबत याचाही वापर करता येईल

बेकिंग सोडा आणि पेपर

पाण्याच्या बॉटलमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि पेपरची तुम्ही मदत घेऊ शकता. बेकिंग सोडा एक नॅचरल डिओडराइजरसारखं काम करतो. तर पेपर ओलसरपणा घालवतो. दुर्गंधी घालवायची असेल तर पेपरची एक स्ट्रिप घ्या आणि त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. या स्ट्रिपला फोल्ड करून पाण्याच्या बॉटलमध्ये टाकून 5-6 तास असंच सोडा. दुर्गंधी जाईल.

लिंबू आणि पेपर

लिंबाची साल अँटी बॅक्टेरिअल असते. तसेच रिफ्रेशिंग स्मेल देण्यातही लिंबाच्या सालीची मदत होते. बॉटलमधून दुर्गंधी येत असेल तर लिंबूच्या साली सुकवा आणि त्या पेपरमध्ये गुंडाळून बॉटलमध्ये टाकून रात्रभर तशाच ठेवा.

कॉफी पावडर आणि पेपर

कॉफीमध्ये स्मेल प्रचंड असते. दुर्गंधी शोषून घेण्यास त्याचा फायदा होतो. तर पेपरमध्ये ओलसरपणा शोषून घेतला जातो. बॉटलमधील दुर्गंधी घालवण्यासाठी पेपरची एक स्ट्रिप घेऊन त्यावर 1 ते 2 चमच कॉफी पावडर पसरवा. त्यानंतर पेपर गुंडाळून तीन ते चार तासासाठी तसाच ठेवा. त्यानंतर पेपर काढा आणि बॉटल स्वच्छ करा. दुर्गंधी गायब होईल.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.