AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तांब्या, पितळेच्या भांड्यावरील हट्टी डाग जात नाहीत? झटपट चमकदार बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स

हिंदू धर्मात तांब्या आणि पितळेच्या भांड्यांना फार मोठं महत्त्व आहे. कारण या भांड्यांचा वापर पुजेसाठी केला जातो. पण अनेक दिवस एका पिशवीत बांधून ठेवल्यानंतर भांड्यांवर हट्टी डाग बसतात. म्हणून झटपट चमकदार बनवण्यासाठी जाणून घ्या काही सोप्या टिप्स

तांब्या, पितळेच्या भांड्यावरील हट्टी डाग जात नाहीत? झटपट चमकदार बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स
| Updated on: Sep 05, 2026 | 4:41 PM
Share

आता सगळे सण जवळ येत आहे. लवकरच सर्वांच्या घरात गणरायाचं आगमन होणार आहे. यासाठी सर्वांची तयारी देखील सुरु झाली आहे. पण सर्वात मोठा टास्क असतो, तांबे आणि पितळ्यांची भांडी साफ करणं… सांगायचं झालं तर, भारतीय घरांमध्ये तांबे, पितळ, शिसे आणि चांदी यांसारख्या धातूंपासून बनवलेली भांडी विशेष प्रसंगी आणि विधींसाठी वापरली जातात. पण ही भांडी कायम वापरत नसल्याने कधीकधी ती काळी पडतात, म्हणून वाळलेल्या शेणाच्या राखेने घासून ती स्वच्छ केली जातात. जर तुम्ही या दिवशी पितळ, तांबे किंवा चांदीची भांडी वापरत असाल, तर ती पटकन आणि सहजपणे स्वच्छ करण्यासाठी येथे काही सोपे उपाय दिले आहेत. पितांबरीने भांडी साफ केल्याने हातावर इजा होतात. तर जाणून घ्या काही सोप्या टीप्स…

तुमच्या घरात पितळेची भांडी, ताटं किंवा वाट्या असतील तर, ती स्वच्छ करण्यासाठी एक लिंबू अर्धा कापून घ्या. त्या मिश्रणावर थोडं पांढरे मीठ शिंपडा. पितळेच्या भांड्याच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूस गोलाकार फिरवत ते मिश्रण चांगल्या प्रकारे चोळा. तुमच्या लक्षात येईल की डाग लगेच नाहीसे होतीस. त्यानंतर, ते एका कोरड्या सुती कापडाने धुऊन पुसून घ्या. दुसरा पर्याय म्हणून, हळद पावडर दह्यात मिसळून पेस्ट बनवा आणि ती काही मिनिटे भांड्यावर तशीच राहू द्या, म्हणजे ते पूर्णपणे स्वच्छ होईल.

पितळेप्रमाणेच, तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि दह्याची पद्धत वापरू शकता. तांब्याच्या भांड्यांना चमकदार बनवण्यासाठी चिंच खूप प्रभावी आहे. एक चिंच पाण्यात भिजवून तिचा गर काढा, तो लगद्याप्रमाणे संपूर्ण भांड्यावर लावा आणि 5 मिनिटं तसाच राहू द्या. त्यानंतर, स्क्रबरने धुऊन कोरडे पुसून घ्या.

चांदीची भांडी कशी स्वच्छ करावी

चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी, प्रथम पाणी गरम करा. नंतर, एका मोठ्या भांड्यात ॲल्युमिनियम फॉइल पसरवा. पाण्यात बेकिंग सोडा आणि मीठ मिसळा. चांदीची भांडी पाण्यात ठेवा आणि किमान 20 मिनिटं भिजत ठेवा. या काळात, सर्व काळपटपणा निघून जाईल. आता, मऊ ब्रश किंवा स्क्रबरने ते घासून स्वच्छ करा. या पद्धतीने तुम्ही चांदीचे दागिने देखील स्वच्छ करू शकता.

टोमॅटोचाही वापर करता येतो

जर तुमच्याकडे हे सर्व साहित्य नसेल, तर तुम्ही भांडी स्वच्छ करण्यासाठी टोमॅटोचा रस देखील वापरू शकता. मात्र, तो कमी आम्लधर्मी असल्यामुळे तुम्हाला कमी मेहनत करावी लागेल. तुम्ही भांडी स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि सैंधव मीठ देखील वापरू शकता.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…