भारतातील ‘या’ प्रसिद्ध तलावाला बॉलिवूडच्या ‘धकधक गर्ल’चे नाव, जाणून घ्या यामागची कथा…

अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथून सुमारे दोन ते तीन तासांच्या अंतरावर, आपण स्वत:ला नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या मंत्रमुग्ध ठिकाणी पोहोचवू शकता.

भारतातील ‘या’ प्रसिद्ध तलावाला बॉलिवूडच्या ‘धकधक गर्ल’चे नाव, जाणून घ्या यामागची कथा...

मुंबई : अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथून सुमारे दोन ते तीन तासांच्या अंतरावर, आपण स्वत:ला नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या मंत्रमुग्ध ठिकाणी पोहोचवू शकता. हे ठिकाण सांगतेसर तलावाच्या नावामुळे खूप प्रसिद्ध आहे (Sangtesar Lake situated in Arunachal Pradesh rename after madhuri dixit koyla film shooting).

सांगतेसर तलाव

1973च्या भूकंपाचा परिणाम म्हणून हा तलाव तयार झाला होता. या तलावाला जाण्याचा मार्ग जेमिथांगपासून सुरू होतो आणि यामध्ये 52 हेअरपिन आहेत. तलावाच्या मधोमध खूप झाडे आहेत. हिवाळ्यादरम्यान, सांगतेसर तलाव गोठतो आणि केशरी-निळा, तसेच बर्फाळ पृष्ठभागावर धगधगणारा सूर्याचा प्रकाश तलाव पाहण्याचा आनंद दुप्पट करतो. हा तलाव जवळच्या शहर तवांगपासून 30 कि.मी. अंतरावर आहे. तलाव समुद्रसपाटीपासून 3,708 मीटर उंचीवर आहे. या तलावाकडे जाण्यासाठी पर्यटक ट्रेनमार्गे तवांगला पोहोचू शकतात. तेथे तलावाच्या शेजारी एक छोटासा पार्किंग बेस असून, फूड स्टॉलदेखील आहेत.

सांगतेसर तलावाला ‘माधुरी दीक्षित’चे नाव कसे पडले?

या तलावाचे मूळ नाव ‘सांगतेसर तलाव’ असे म्हणतात. परंतु, आता त्याला ‘माधुरी तलाव’ म्हणून ओळखले जात आहे. हे कसे घडले हे जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल. याचे कारण आहे, 90च्या दशकात, या तलावाजवळ चित्रित झालेले शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितने बॉलिवूड फिल्म ‘कोयला’ मधील एक गाणे.. हे गाणे इतके प्रसिद्ध झाले की, या तलावाला लोकांकडून ‘माधुरी तलाव’ असे नाव देण्यात आले. या नावामुळे, येथे येणारे पर्यटक, या तलावाचा शोध घेत, इथपर्यंत येतात (Sangtesar Lake situated in Arunachal Pradesh rename after madhuri dixit koyla film shooting).

तलावाकडे जाणारा रस्ता

या तलावाकडे जाणे इतके सोपे नाही. येथे जाण्यासाठी 50हून अधिक हेअरपिनसारखे वळणे असलेले कठीण रस्ते आहेत. या तलावाला भेट देण्यासाठी तवांग येथे असलेल्या जिल्हा आयुक्त (डीसी) कार्यालयाकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. कोणत्याही परदेशी व्यक्तीस या तलावाच्या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही.

तवांग येथून सांगतेसर तलावावर जाण्यासाठी सुमारे दोन ते साडेतीन तास लागतात. या मार्गात पर्यटक बर्फाच्छादित पर्वत, हिमनदी आणि जलकुंभ पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.

या कठीण प्रवासाची तयारी कशी करावी?

‘सांगतेसर’ म्हणजेच माधुरी तलावाकडे जाताना सोबत जास्तीत जास्त पिण्याचे पाणी घेऊन जाणे चांगले. येथे जाण्यासाठी आपण सकाळी 7.30 ते 8 वाजताच्या दरम्यान प्रवास सुरू करू शकता. पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी जुलैच्या आसपास आपल्या सहलीचे नियोजन करण्याचा प्रयत्न करा.

तलावाच्या ठिकाणी करण्यासारख्या आणखी गोष्टी…

तलावाजवळ सैन्य तळ आहे, ज्यात पर्यटकांना अगदी स्वस्त किंमतीत ग्लोव्हज, शूज, जॅकेट्स इत्यादी गोष्टी मिळतात. भारतीय सैन्याकडून येथे येणाऱ्या लोकांना प्रत्येक मदत केली जाते. ते गरमागरम चहा / कॉफी, मॅगी आणि इतर स्नॅक्स पर्यटकांना देतात.

(Sangtesar Lake situated in Arunachal Pradesh rename after madhuri dixit koyla film shooting)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI