AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परफ्यूम कपड्यांवर लावावा की त्वचेवर; 99 % लोक चुकीच्या पद्धतीने लावतात परफ्यूम

परफ्यूम लावताना अनेकजण गोंधळात असतात की परफ्यूम थेट त्वचेवर लावावा कि कपड्यांवर. परफ्यूम त्वचेवर लावल्याने सुगंध अधिक काळ टिकतो, त्याचे नुकसानही आहे.तसेच त्वचेवर लावण्याऐवजी कपड्यांवर परफ्यूम लावणं जास्त फायदेशीर असतं का? चला जाणून घेऊयात परफ्यूम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

परफ्यूम कपड्यांवर लावावा की त्वचेवर; 99 % लोक चुकीच्या पद्धतीने लावतात परफ्यूम
Should apply perfume on your skin or on your clothes, Lets learn the correct way to apply perfumeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 16, 2025 | 8:10 PM
Share

परफ्यूम लावणं कोणाला नाही आवडत, अनेकांना परफ्यूम जमा करण्याचा शौक असतो. महागडे परफ्यूम लावण्याचं वेड असतं. तसेच सकाळी घराबाहेर पडताना परफ्यूम लावणे हा जवळजवळ प्रत्येकाच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग असतो. पण कधी कधी एक प्रश्न उपस्थित केला जातो तो म्हणजे परफ्यूम थेट त्वचेवर लावणे योग्य आहे की फक्त कपड्यांवर लावणे? कारण परफ्यूम लावताना अनेकजण मनगटावर , मानेवर तसेच कानाजवळ स्प्रे करतात. पण यामुळे अनेकांना तिथे खाज सुटते किंवा रेडनेस येतं.

अनेकांना हा प्रश्न पडतो की परफ्यूम हा थेट त्वचेवर लावणे योग्य आहे की कपड्यांवर ?

पण अनेकदा हे समजत नाही की ते परफ्यूममुळे होतं. त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडतो की परफ्यूम हा थेट त्वचेवर लावणे योग्य आहे की, कपड्यांवर लावल्याने देखील तसेच परिणाम मिळतात. कपड्यांवर परफ्यूम मारल्याने देखील त्याचा सुगंध जास्त काळ टिकतो का? योग्य ती माहिती नसल्याने बरेचजण चुकीच्या पद्धतीने परफ्यूम लावतात. चला जाणून घेऊयात योग्य पद्धत कोणती आहे ते.

त्वचेवर थेट परफ्यूम लावण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

फायदे

शरीराच्या उष्णतेमुळे परफ्यूमचा सुगंध सक्रिय होतो, ज्यामुळे त्याचे आयुष्य वाढते. परफ्यूम त्वचेवर लावल्याने सुगंध हळूहळू वाढत जातो. आणि ते अधिक नैसर्गिक सुवास देतात.

नुकसान

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर परफ्यूममध्ये असलेले अल्कोहोल आणि रसायने ऍलर्जी, खाज निर्माण करू शकतात. काही परफ्यूम सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्वचेवर काळे डाग देखील निर्माण करू शकतात.त्यामुळे थेट त्वचेवर परफ्यूम लावणे टाळा.

कपड्यांवर परफ्यूम लावण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

फायदे

कपड्यांवर परफ्यूम लावल्याने सुगंध जास्त काळ टिकतो, विशेषतः जर कापड शोषक असेल (जसे की कापूस किंवा तागाचे कापड). तसेच कपड्यांवर परफ्यूम लावल्याने त्वचेच्या प्रतिक्रियेचा धोका होत नाही.

नुकसान

काही परफ्यूम कपड्यांवर डाग लावू शकतात, विशेषतः गडद रंगाचे कापड किंवा रेशीम सारख्या नाजूक कापडांवर परफ्यूमचे डाग पडू शकतात. तसेच ते धुतले तरी देखील अशा कपड्यांवरचा डाग निघत नाही.

परफ्यूम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

जर तुमची त्वचा संवेदनशील नसेल, तर परफ्यूम थेट नाडीच्या बिंदूंवर (मनगट, मान, कानांच्या मागे) लावा.पण आधी थोडासा परफ्यूम लावून पॅचटेस्ट करून घ्या. सुगंध बराच काळ टिकवून ठेवण्यासाठी कपड्यांवर थोडासा परफ्यूम स्प्रे करा, परंतु प्रथम ते कापड्याच्या छोट्याशा भागावर तपासा कि त्याचे डाग लागतायत की नाही ते. जेणेकरून त्यावर डाग पडत नाहीत याची खात्री होईल मगच थेट कपड्यांवर परफ्यूम लावा.

परफ्यूम लावण्याची अजून एक पद्धत: प्रथम बॉडी परफ्यूम किंवा डीओ लावा आणि नंतर कपड्यांवर हलके स्प्रे करा. यामुळे सुगंध दिवसभर टिकतो.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.