Dry Shampoo | हिवाळ्यात ड्राय शॅम्पूचा वापर ठरेल हानिकारक, वाचा याचे दुष्परिणाम

Dry Shampoo | हिवाळ्यात ड्राय शॅम्पूचा वापर ठरेल हानिकारक, वाचा याचे दुष्परिणाम

ड्राय शॅम्पूचा वापर केल्याने आपला बराच वेळ देखील वाचतो. परंतु हा ड्राय शॅम्पू तुमच्या केसांनाही इजा देखील पोहोचवू शकते.

Harshada Bhirvandekar

|

Jan 18, 2021 | 4:09 PM

मुंबई : हिवाळ्यात, बहुतेक लोक कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्येमुळे त्रस्त असतात. वारंवार वाढणारी थंडी पाहता केस सतत केस धुणे म्हणजे मोठे त्रासदायक काम आहे. अशा वेळी गरज असल्यास, कधीकधी आपण ड्राय शॅम्पूने केस धुवू शकता. ड्राय शॅम्पूचा वापर केल्याने आपला बराच वेळ देखील वाचतो. परंतु हा ड्राय शॅम्पू तुमच्या केसांनाही इजा देखील पोहोचवू शकते. त्याचे फायदे पाहून, बहुतेक स्त्रिया त्यामुळे होणाऱ्या नुकसानाकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे भविष्यात त्यांना केस गळतीचा त्रास सहन करावा लागतो (Side Effects of Dry Shampoo during winter season).

ड्राय शॅम्पू वापरण्यास अतिशय सोपा आहे. धावपळीच्या आयुष्यात आपला वेळ वाचवा म्हणून काही स्त्रिया दैनंदिन वापरामध्ये देखील ड्राय शॅम्पू वापरण्याची चूक करतात. ड्राय शॅम्पूचा जास्त वापर केल्याने स्काल्पमध्ये खाज येते. याशिवाय जास्त वेळा ड्राय शॅम्पूचा वापर केल्याने केस गळतीची समस्या सुरु होते.

ड्राय शॅम्पूचा वापर करताना बाटली केसांच्या अगदी जवळ ठेवू नका. केसांना केस धुण्यासाठी ड्राय शॅम्पूचा वापर करताना नेहमी चार ते सहा इंच अंतरावरून स्प्रे शिंपडा. यामुळे आपले केसांमध्ये चिकट होणार नाही. कारण, अधिक जवळून केसांवर ड्राय शॅम्पूचा वापर केल्यास केस ओले दिसू लागतात (Side Effects of Dry Shampoo during winter season).

ड्राय शॅम्पूची निवड करताना आपल्या केसांच्या कलर टोननुसार शॅम्पू निवडा. जर आपले केस काळे असतील तर गडद रंगाचे ड्राय शॅम्पू निवडा. ड्राय ड्राय शॅम्पू आपल्या केसांमधून तेल काढून टाकण्याचे काम करतो. यानंतर, आपण कोणत्याही प्रकारे आपले केस स्टाईल करू शकता.

ड्राय शॅम्पूचा वापर करण्याची योग्य पद्धत

ड्राय शॅम्पूचा वापरण्यापूर्वी केसांमधून हेअरपिन, हेअर बँड वगैरे काढा. ड्राय शॅम्पूच्या पावडरचा वापरत करत असल्यास, ते शॅम्पूसारखे हलक्या हातांनी मुळांवर लावा. जर, आपल्याला ड्राय शॅम्पूचा स्प्रे वापरायचा असल्यास तो कमीतकमी सहा ते सात इंच अंतरावर पकडा. आपण जितक्या लांबून स्प्रेची फवारणी करता तितके केसांसाठी अधिक चांगले. फवारणीनंतर ब्रशच्या मदतीने ड्राय शॅम्पू सगळ्या केसांमध्ये व्यवस्थित पसरवा.

(Side Effects of Dry Shampoo during winter season)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें