AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Selfie Side Effects | सेल्फी काढण्याची सवय लागलीय? थांबा! होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार…

कित्येक लोक तासन् तास, हजारो सेल्फी काढत असतात. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने ‘हे’ हानिकारक आहे.

Selfie Side Effects | सेल्फी काढण्याची सवय लागलीय? थांबा! होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार...
| Updated on: Jan 06, 2021 | 3:18 PM
Share

मुंबई : स्वतःचे फोटो काढणे कोणाला नाही आवडत? या फोटो तंत्रज्ञानात झालेला नवा अविष्कार म्हणजे सेल्फी. कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःचा फोटो काढण्यालाच सेल्फी म्हणतात. सेल्फी घेण्याची क्रेझ आजकाल प्रत्येकामध्ये आहे. तुम्हाला कुठेतरी फिरायला जाण्याचा किंवा काही मित्र-मैत्रिणी किंवा ओळखीच्या लोकांना भेटण्याचा प्लॅन बनतो, तेव्हा सगळे जमल्यावर सेल्फी घेण्याचा सोहळाच सुरू होतो. फिरत असलेल्या प्रत्येक ठिकाणी आणि जर आपण कोणाला भेट असू, तर त्या प्रत्येक व्यक्तीसोबत सेल्फी फोटो काढले जातात (Side Effects of Selfie this habit can cause harmful diseases).

कित्येक लोक तासन् तास, हजारो सेल्फी काढत असतात. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने ‘हे’ हानिकारक आहे. जर, तुम्हालाही सतत सेल्फी घेण्याची आवड असेल, तर लवकरात लवकर आपल्या या सवयीला ‘बाय बाय’ म्हणा. कारण जास्त सेल्फी काढण्याची सवय तुम्हाला तुमच्या वयापेक्षा लवकर वयस्कर बनवते. तसेच ही सेल्फी तुमच्या अनेक आजारांना कारणीभूत देखील ठरू शकते.

सेल्फीचे दुष्परिणाम :

  1. सेल्फी घेण्याची सवय तुम्हाला ओसीडीचा रुग्ण बनवू शकते. ओसीडी हा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. आजकाल अनेक तरुणांमध्ये ही समस्या वाढत आहे. यात एखाद्या व्यक्तीला सेल्फी घेण्याची व्यसन लागते. ओसीडी झालेल्या रुग्णाचे मन त्याला वारंवार कुठेतरी जाऊन सेल्फी घेण्यास भाग पाडते.
  2. या व्यतिरिक्त अॅक्यूट सेल्फाइटिसची समस्या देखील सध्या अनेक तरूणांमध्ये दिसून येत आहे. यात एखाद्या व्यक्तीला दिवसातून तीन ते चार वेळा सेल्फी घेण्याची इच्छा होत राहते. त्याचबरोबर वारंवार सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्याची आणि सोशल मीडियावरील कमेंट वाचण्याची सवय लागते (Side Effects Of Selfie).
  3. याशिवाय बहुतेक तज्ज्ञांचे असे मत आहे की, सेल्फी घेताना चेहऱ्यावर निळा प्रकाश आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकते. सेल्फी घेताना सनस्क्रीन लेयर मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गास रोखू शकत नाही. यामुळे त्वचेचे नुकसान देखील होऊ शकते.
  4. सेल्फी काढण्याच्या सवयीमुळे वय देखील वेगाने वाढत असल्यासारखे वाटते. तरुण वयात एखादा व्यक्ती वृद्धत्वाकडे झुकल्यासारखा दिसू लागतो. या सवयीमुळे आपल्या चेहर्‍यावर अकाली सुरकुत्या पडू लागतात, ज्यामुळे आपण अकाली म्हातारे वाटू शकता.
  5. सेल्फी घेताना मोबाईलमधून निघणाऱ्या हानिकारक रेडिएशनचा परिणाम त्वचेमध्ये असलेल्या डीएनएवरही होतो. ज्यामुळे त्वचा निस्तेज होऊन, तिची पुन्हा सजीव होण्याची क्षमता प्रभावित होते.

(Side Effects of Selfie this habit can cause harmful diseases)

हेही वाचा :

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.