Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद शतकानुशतके पारंपारिक औषधे तयार करण्यासाठी वापरली जात आहे. ह्रदयरोगापासून, आर्थरायटीस आणि कर्करोगाच्या अनेक प्रकारांच्या उपचारांमध्येही हळद फायदेशीर मानली जाते.

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!
हळद

मुंबई : हळद हा आपल्या स्वयंपाकघरातील एक सर्वात सामान्य मसाला आहे. आजकाल कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात हळदयुक्त दुधाचे सेवन करत आहेत. काही लोक, तर आलं आणि हळद गरम पाण्यात मिसळत आहे तर, काही लोक आले, हळद आणि मध खात आहेत. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद शतकानुशतके पारंपारिक औषधे तयार करण्यासाठी वापरली जात आहे. ह्रदयरोगापासून, आर्थरायटीस आणि कर्करोगाच्या अनेक प्रकारांच्या उपचारांमध्येही हळद फायदेशीर मानली जाते. परंतु, एखाद्या चांगल्या गोष्टीचा जास्त वापर केला गेला, तरी ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. चला तर, हळद किती वापरावी आणि जास्त प्रमाणात हळद वापरण्याचे तोटे जाणून घेऊया…(Side Effects of turmeric  on health)

हळद किती वापरावी?

संशोधनानुसार, दररोज फक्त 1 चमचे हळद वापरण्याची शिफारस केली जाते. परंतु, यापेक्षा जास्त हळद वापरल्यास शरीरावर बरेच वाईट परिणाम दिसू शकतात. बरेच लोक हळदीच्या पूरक पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करण्यास देखील प्रारंभ करतात, ज्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो.

जास्त हळद वापरल्याने पोट होऊ शकते खराब

हळद शरीर आतून उबदार ठेवते आणि म्हणून जर एखाद्या व्यक्तीने हळदीचा जास्त वापर केला तर पोटात जास्त जळजळ होण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे पोट खराब होते आणि अतिसार होतो. जास्त हळद वापरल्यामुळे बर्‍याच लोकांना पोटदुखी आणि पोटफुगी देखील येऊ शकतात.

हळद लोह शोषणात अडथळा आणते.

ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे, अशा लोकांसाठी ही हळद एक गंभीर समस्या समस्या ठरू शकते. वास्तविक, जास्त प्रमाणात हळद सेवन केल्याने शरीरातील लोह शोषण्याची क्षमता कमी होते. या संदर्भात केलेल्या एका संशोधनानुसार, जास्त प्रमाणात हळद, मिरची, लसूण इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात लोह शोषण्याची क्षमता 20 ते 90 टक्क्यांनी कमी होते. म्हणून, हळद मर्यादित प्रमाणात खा (Side Effects of turmeric  on health).

किडनी स्टोनचा धोका वाढतो.

हळदीमध्ये ऑक्सॅलेट्स आढळतात आणि त्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने मूत्रपिंडात खडे अर्थात मुतखडा होण्याचा धोका संभवतो. ऑक्सॅलेट्स स्वत:ला शरीरात उपस्थित असलेल्या कॅल्शियमशी एकसंध करतात आणि न विरघळणारे कॅल्शियम ऑक्सलेट तयार करतात, ज्यामुळे मूत्रपिंडात दगड तयार होतात. म्हणून, किडनीचे नुकसान टाळण्यासाठी हळदीचे मोठ्या प्रमाणात सेवन करू नका.

अति हळद सेवनमुळे मळमळ होते.

हळदीत आढळणारे कर्क्युमिन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असळे, तरी या कर्क्यूमिनमुळे मळमळ आणि उलट्यांचा त्रास देखील होऊ शकतो. म्हणून, हळद असलेले दूध, हळद पाणी आणि हळद पूरक आहार प्रमाणात आणि मर्यादित स्वरुपात घ्या.

अॅलर्जी होऊ शकते.

हळदीमध्ये काही संयुगे आहेत ज्याच्या अॅलर्जीमुळे काही लोकांना पुरळ, पुळ्या येतात किंवा दम लागतो. शरीरावर हळद लावल्यानंतरही काही लोकांना या समस्या जाणवू शकतात.

(Side Effects of turmeric  on health)

हेही वाचा :

Gulkand Benefit | वजन कमी करण्यापासून ते अनेक समस्यांवर गुणकारी ‘गुलकंद’, जाणून घ्या याचे फायदे..

Constipation Problem | बद्धकोष्ठतेच्या समस्येला तुमच्यापासून दूर ठेवतील ‘हे’ रस, नियमित करा सेवन!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI