Skin Care | हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही तर करत नाही ना ‘या’ चुका? होऊ शकते त्वचेचे नुकसान!

Skin Care | हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही तर करत नाही ना 'या' चुका? होऊ शकते त्वचेचे नुकसान!
मानेचे टॅनिंग काढण्याचे हे आहेत सर्वात सोपे मार्ग

हिवाळ्याच्या दिवसांत थंड वाऱ्यामुळे त्वचेत कोरडेपणा आणि ताण जाणवू लागतो. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणे थोडे अवघड होते. ज्यामुळे त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसू लागते.

Harshada Bhirvandekar

|

Jan 28, 2021 | 4:13 PM

मुंबई : हिवाळ्याच्या दिवसांत थंड वाऱ्यामुळे त्वचेत कोरडेपणा आणि ताण जाणवू लागतो. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणे थोडे अवघड होते. ज्यामुळे त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसू लागते. मात्र, कधीकधी आपण अति आळशीपणामुळे लहान लहान चुका करतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो (Skin care mistakes during winter season).

स्त्रिया अनवधानाने या चुका करतात, ज्यामुळे त्वचेला गंभीर नुकसान होऊ शकते. म्हणूनच आम्ही तुम्हाला त्या चुका सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्ही त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करू शकाल. चला तर जाणून घेऊया या सामान्य चुकांबद्दल…

कमी पाणी पिणे

उन्हाळ्यात शरीराला भरपूर पाण्याची गरज असल्याने खूप पाणी प्यायले जाते. परंतु, हिवाळ्यात थंडीमुळे तहान कमी लागते आणि कमी पाणी शरीरात जाते. परंतु हे त्वचेसाठी घातक ठरते. हिवाळ्यातही हवा कोरडी असल्याने शरीराला अधिक पाण्याची गरज असते. कोरड्या हवामानामुळे शरीरातील पाणी कमी होते. हिवाळ्यात तहान कमी झाल्यामुळे बहुतेक लोक पुरेसे पाणी घेत नाहीत. ज्यामुळे त्वचा निर्जलीकरण होते. त्वचेची ओलावा टिकवून ठेवण्यासाठी त्वचेला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. म्हणून दररोज 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

हिवाळ्यातील स्क्रबिंग

आपण आपली त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी त्वचेला नियमित स्क्रब करतो. असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील आणि शरीरावरील मृत त्वचा काढून टाकली जाते. परंतु, यामुळे आपली त्वचा कोरडी होते. अशावेळी इच्छित असल्यास, आपण क्लींजिंग क्रीम वापरून आपली त्वचा स्क्रब करू शकता. यासाठी मध आणि पिठाचा कोंडा त्वचा स्क्रब करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

अधिक क्रीम लावणे

हिवाळ्यात, त्वचा फाटलेली आणि कोरडी दिसू लागते. त्यानंतर लोक लगेचच त्यावर मॉइश्चरायझिंग क्रीम आणि तेल लावण्यास सुरुवात करतात. मात्र, हे पूर्णपणे चुकीचे आहे. जास्त प्रमाणात क्रीम लावल्यामुळे त्वचेवर एक थर आल्यामुळे त्वचेला नीट श्वास घेता येत नाही. यामुळे, पुरळ, खाज सुटणे आणि मुरुमांचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच, त्वचेला आतून आणि बाहेरून हायड्रेट करणे महत्त्वाचे आहे (Skin care mistakes during winter season).

त्वचेची काळजी घेणारी उत्पादने काळजीपूर्वक निवडा

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणारी उत्पादने हिवाळ्यात आवश्यक नसतात. म्हणूनच, आपण हवामानानुसार उत्पादन निवडले पाहिजे. हिवाळ्यात निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लीन्सर वापरा म्हणजे त्वचा ओलसर राहील. ही उत्पादने निवडताना आपल्या त्वचेचा पोत लक्षात घ्या. जेणेकरून ती उत्पादने अधिक प्रभावी ठरू शकतील.

आहाराची काळजी घ्या

हिवाळ्यात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात. फळे आणि हिरव्या भाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते. परंतु या हंगामात, विशेषत: बेरीज् (स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी) खाणे फायद्याचे ठरते. बेरीमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते. हिवाळ्यात आहारात सूप, कोशिंबीर, रस आणि दूध यांचा समावेश करावा. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin care mistakes during winter season)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें