Skin Care Tips | फेशियलनंतर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, चेहऱ्यावर उद्भवू शकतात समस्या!

बर्‍याच वेळा, फेशियलनंतर स्त्रिया अशा चुका करतात, ज्यामुळे चेहऱ्याला फायदा होण्याऐवजी त्याचे उलट परिणाम होतात. यामुळे त्वचेला चमक येत नाही परंतु, ती अधिक निस्तेज दिसू लागते.

Skin Care Tips | फेशियलनंतर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, चेहऱ्यावर उद्भवू शकतात समस्या!
घरच्या घरी करा फ्रूट फेशियल

मुंबई : बहुतेक सौंदर्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, वयाच्या 30व्या वर्षानंतर प्रत्येक महिलेने महिन्यातून एकदा तरी फेशियल केलेच पाहिजे. यामुळे चेहऱ्यावर चमक टिकून राहते, तसेच चेहऱ्याच्या त्वचेवर घट्टपणा देखील येतो, ज्यामुळे वृद्धत्वाचा परिणाम फार लवकर दिसून येत नाही (Skin Care Tips After Facial).

परंतु, बर्‍याच वेळा, फेशियलनंतर स्त्रिया अशा चुका करतात, ज्यामुळे चेहऱ्याला फायदा होण्याऐवजी त्याचे उलट परिणाम होतात. यामुळे त्वचेला चमक येत नाही परंतु, ती अधिक निस्तेज दिसू लागते. पुढील वेळी आपण फेशियलसाठी जाल तेव्हा, या चुका करणे टाळा म्हणजे आपण हे वाईट परिणाम आधीच रोखू शकाल.

उन्हात बाहेर पडू नका.

फेशियल नंतर थेट प्रखर उन्हात बाहेर पडू नका, यामुळे रीअॅक्शन होण्याचा धोका असतो. वास्तविक, फेशियलनंतर, चेहऱ्यावरील सर्व पोर्स उघडतात आणि ते पोर्स मोठे होतात. अशा परिस्थितीत, प्रखर सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर पुरळ किंवा पुळ्या येऊ शकतात.

फेसवॉश वापरू नका.

फेशियलनंतर तीन ते चार दिवस फेस वॉश न वापरण्याचा सल्ला दिला जातो. परंतु पहिल्या तीन ते चार तासांत चुकूनही आपला चेहरा फेस वॉश किंवा साबणाने धुवू नका. यामुळे चेहऱ्यावरील फेशियलचा काहीच परिणाम होणार नाही आणि चेहरा निस्तेज होईल. जेव्हा जेव्हा आपण आपले तोंड धुता, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हलके पाणी शिंपडा. तसेच, तोंड टॉवेलने पुसण्याची चूक करू नका.

चेहरा स्क्रब नका.

स्क्रब चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतो. परंतु फेशियल केल्यानंतर मृत त्वचा आणि घाण दूर होते. अशा परिस्थितीत नवीन ऊतक तयार होण्यासाठी दोन दिवस लागतात. म्हणून दोन ते तीन दिवस स्क्रब करू नका. यामुळे त्वचेची चामडी निघू शकते. तसेच फेसमास्कही लावू नका. यामुळे फेशियल निष्फळ ठरते. फेशियलचा प्रभाव सामान्यत: किमान 15 ते 20 दिवस टिकतो (Skin Care Tips After Facial).

थ्रेडिंग टाळा.

आपण थ्रेडिंग पूर्ण करू इच्छित असल्यास, शक्यतो ते फेशियलच्या आधी किंवा तीन ते चार दिवसांनी करा. फेशियलनंतर चेहऱ्यावरील त्वचा खूप मऊ होते. अशा परिस्थितीत थ्रेडिंगमुळे त्वचेचे चामडी सोलली जाऊ शकते.

तीन दिवस मेकअप करू नका.

फेशियलनंतर चेहऱ्यावर कॉस्मेटिक उत्पादने कमीतकमी तीन दिवस तरी वापरु नयेत. वास्तविक फेशियलमुळे, चेहऱ्यावरील पोर्स उघडतात. अशा परिस्थितीत, या उत्पादनांमध्ये असलेली रसायने त्वचेत जातात. यामुळे आपला चेहरा खराब होतो, तसेच त्वचेचे नुकसान होते.

(Skin Care Tips After Facial)

हेही वाचा :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI