AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care | त्वचेची निगा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते ‘फेशिअल ऑईल’, अशा प्रकारे करा वापर…

बाजारात विविध प्रकारचे स्किन फेशिअल ऑइल उपलब्ध आहेत. हे ऑईल त्वचा निरोगी आणि निरोगी बनवतात.

Skin Care | त्वचेची निगा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते ‘फेशिअल ऑईल’, अशा प्रकारे करा वापर...
त्वचेची निगा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते ‘फेशिअल ऑईल’
| Updated on: Feb 03, 2021 | 2:41 PM
Share

मुंबई : हिवाळ्यात, स्त्रिया त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. बाजारात विविध प्रकारचे स्किन फेशिअल ऑइल उपलब्ध आहेत. हे ऑईल त्वचा निरोगी आणि निरोगी बनवतात. आपण इच्छित असल्यास, चेहऱ्यावरील मेकअप स्वच्छ करण्यासाठी आणि मेकअप बेस तयार करण्यासाठी चेहऱ्यावर या तेलांचा वापर करू शकता (Skin care tips using skin facial oil).

स्कीन ऑईल लावल्याने त्वचेवर तेल जमा होते, असं लोकांना वाटतं. परंतु असे नाही, हे तेल लावल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते. या थंडीच्या दिवसात फेशियल ऑईलची मागणी लक्षणीय वाढली आहे. चला तर, स्कीन ऑईल वापरून आपण आपली त्वचा निरोगी कशी ठेवू शकतो, ते जाणून घेऊया…

चेहऱ्यावर मसाज करा

या तेलांनी चेहऱ्यावर मसाज केल्याने भरपूर फायदा होतो. रात्री झोपेच्या आधी स्कीन ऑईलचे 4 ते 5 थेंब हातावर घेऊन त्याने चेहऱ्यावर मसाज करा. हलक्या हातांनी चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये मालिश करा. दररोज आपळ्या चेहऱ्यावर मसाज केल्यास डाग व मुरूम कमी होतात.

अकाली वृद्धत्व कमी करण्यासाठी

डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेवर स्कीन ऑईल वापरले जाऊ शकते. आपण ते आय क्रीम प्रमाणे देखील वापरू शकता. यामुळे आपल्या डोळ्याखाली येणाऱ्या सुरकुत्या आणि कोरडेपणा कमी होतो.

मेकअप हायलाइटर म्हणून वापर

जर आपल्याला लग्न आणि पार्टीत हायलायटेड मेकअप हवा असेल, तर आपण मेकअप हायलायटरमध्ये फेस ऑईलचा वापर करावा आणि ते चेहऱ्यावर वापरावे. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल (Skin care tips using skin facial oil).

मेकअप बेस म्हणून वापर

आपण इच्छित असल्यास, चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी स्कीन फेशिअल ऑईल वापरू शकता. यासाठी प्रथम फेशिअल ऑईलच्या मदतीने चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर मेकअप प्रायमर चेहऱ्यावर लावा.

मॉइश्चरायझर

आपण त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी या तेलाचा मॉइश्चरायझर म्हणून देखील वापर करू शकता. गुलाबाच्या पाण्यात फेशिअल तेल घालून आपण त्वचेला मॉइश्चरायझ करू शकता.

मेकअप रिमूव्हर म्हणून वापर

तुम्हाला चेहऱ्यावरील तेज कायम टिकवून ठेवायचं असेल तर मेकअप काढताना केमिकल युक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी स्कीन ऑईल वापरा. कापसावर स्कीन ऑईल घ्या आणि मेकअप पुसा. यामुळे मेकअपही निघेल आणि त्वचा देखील चमकेल. शिवाय या तेलामुळे चेहऱ्याला पोषक तत्त्वांचा पुरवठाही होईल.

मुरुमांची समस्या होईल दूर

चेहऱ्यावर मुरुम असल्यास आपल्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण येते. मुरुमांची समस्या असणाऱ्य तरुण-तरुणींनी स्कीन ऑईलचा वापर करावा. या तेलांमध्ये अँटी ऑक्सिडेंटचा समावेश असतो. ज्यामुळे त्वचेवरील बॅक्‍टेरियांचा खात्मा होतो. तसेच या तेलामुळे चेहऱ्यावरील रोमछिद्रे स्वच्छ होतात.

(टीप : सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin care tips using skin facial oil)

हेही वाचा :

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.