त्वचेर दिसणारे हे डाग असू शकतात डायबिटीजची लक्षणे, वाचा नेमके कसे असतात?
आजकाल अनेकांना डायबिटीज होताना दिसत आहे. जंक फूडचे सतत सेवन, व्यायाम न करणे, वेळेवर न झोपणे या सर्वामुळे डायबिटिज होतो. डायबिटिज झाल्यानंतर त्वचेवर काही लक्षणे दिसतात ती कोणती वाचा...

डायबिटीज हा जगभरातील सर्वात सामान्य क्रॉनिक मेटाबॉलिक आजारांपैकी एक आहे. हा आजार फक्त दैनंदिन जीवनावर परिणाम करत नाही, तर दीर्घकाळात गंभीर गुंतागुंती निर्माण करू शकतो. हाय ब्लड शुगरचे संकेत अनेकदा त्वचेवर स्पष्ट दिसू लागतात. हे लक्षण वेळीच ओळखणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आजार गंभीर स्वरूप घेण्याआधीच उपचार सुरू करता येतील. चला जाणून घेऊया डायबिटीजशी संबंधित त्वचेवर दिसणारी लक्षणे कोणती…
१. शिन स्पॉट्स (Shin Spots) किंवा डायबिटिक डर्मोपॅथी
डायबिटिक डर्मोपॅथी ही डायबिटीजमुळे होणारी सर्वात सामान्य त्वचा समस्या आहे. याला स्पॉटेड लेग सिंड्रोम असेही म्हणतात. हे गोल किंवा अंडाकार आकाराचे डाग असतात, ज्यांचा रंग तपकिरी किंवा लाल-तपकिरी असतो. हे डाग सामान्यतः हानिकारक नसतात, पण त्यांचे दिसणे म्हणजे ब्लड शुगर तपासण्याची गरज आहे हे संकेत आहे. दुखणे किंवा खाज येत नसल्याने अनेकजण हे वयाचे डाग समजून दुर्लक्ष करतात.
२. त्वचा कठीण किंवा जाड होणे
दीर्घकाळ हाय ब्लड शुगर राहिल्यास त्वचेत कोलेजनचे असामान्य संचय होऊ शकते, ज्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते आणि त्वचा जाड वाटू लागते. वैद्यकीय भाषेत याला स्क्लेरेडेमा डायबिटिकोरम (Scleredema Diabeticorum) म्हणतात. हे मुख्यतः मान, खांदे किंवा पाठीच्या वरच्या भागात दिसते. हे दुखत नाही आणि बहुतेक वेळा फक्त सौंदर्याची समस्या म्हणून ओळखले जाते.
३. जखम न भरणे
डायबिटीज शरीराची जखम भरून काढण्याची क्षमता कमी करते. हाय शुगरमुळे रक्ताभिसरण बिघडते आणि नसांना नुकसान होते. यामुळे विशेषतः पायांवर झालेल्या जखमा लवकर बरे होत नाहीत, ज्याला डायबिटिक अल्सर म्हणतात. वेळीच उपचार न केल्यास स्थिती गंभीर होऊ शकते आणि अंग कापण्याची वेळ येऊ शकते.
४. त्वचेवर छोटे-छोटे दाणे
अचानक त्वचेवर छोटे दाणे येत असतील तर हेही चेतावणीचे संकेत असू शकते. अनकंट्रोल्ड डायबिटीजमध्ये ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण खूप वाढते. सुरुवातीला हे दाणे दिसतात आणि नंतर हलक्या रंगाच्या त्वचेवर पिवळसर होतात. शुगर नियंत्रणात आल्यावर हे दाणे सहसा नाहीसे होतात.
५. काही भागात त्वचा काळी पडणे
मान, काखा किंवा जांघांच्या आसपास त्वचा काळी आणि जाड होणे हे डायबिटीज किंवा प्री-डायबिटीजचे लक्षण असू शकते. याला अकॅन्थोसिस निग्रिकन्स (Acanthosis Nigricans) म्हणतात आणि हे इन्सुलिन रेझिस्टन्सशी संबंधित असते. बहुतेक प्रकरणांमध्ये हे गंभीर आजाराचे संकेत नसते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या)
