हे DIY टोनर वापरून चेहऱ्यावरील तेलकटपणा करा दूर, चेहरा दिसेल एकदम फ्रेश
तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी योग्य टोनर वापरणे आवश्यक आहे. अशातच घरी बनवलेले नैसर्गिक टोनर बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल टोनरपेक्षा सुरक्षित आणि अधिक प्रभावी असतात. तेलकट त्वचेसाठी टोनर कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी योग्य टोनर निवडणे खूप महत्वाचे आहे, कारण ते त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करते, छिद्रे घट्ट करते आणि त्वचा ताजी ठेवते. अशा परिस्थितीत घरी बनवलेले नैसर्गिक DIY टोनर बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या केमिकलयुक्त टोनरपेक्षा जास्त फायदेशीर असतात.
हे टोनर त्वचेला मऊ करतात आणि कोणत्याही दुष्परिणाम होत नाही. तेलकट त्वचेसाठी परिपूर्ण असलेल्या काही सर्वोत्तम DIY टोनरबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
गुलाबजल आणि कोरफड जेल टोनर
गुलाबपाणी त्वचेला हायड्रेट करते, तर कोरफड त्वचेला थंड ठेवण्यास मदत करते आणि जास्त तेल नियंत्रित करते. म्हणून अर्धा कप कोरफड जेल एक कप गुलाबपाण्यात मिक्स करा आणि स्प्रे बाटलीत भरा आणि चेहऱ्यावर लावा.
ग्रीन टी टोनर
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला डिटॉक्सिफाय करण्यास आणि तेल संतुलन राखण्यास मदत करतात. म्हणून ग्रीन टी उकळवा थंड करा आणि कापसाच्या गोळ्याचा साहाय्याने त्वचेवर लावा किंवा स्प्रे करा.
अॅपल सायडर व्हिनेगर टोनर
अॅपल सायडर व्हिनेगर त्वचेचे पीएच संतुलन राखते आणि अतिरिक्त सेबम कमी करते. यासाठी तीन कप पाण्यात फक्त एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करा, ते स्प्रे बाटलीत ठेवा आणि नंतर त्वचेवर लावा.
कडुलिंब आणि तुळशी टोनर
कडुलिंब आणि तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे मुरुम कमी करण्यास मदत करतात. अशातच कडुलिंब आणि तुळशीची पानं पाण्यात उकळवा, थंड करा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि स्प्रे बाटलीत भरा आणि गरजेनुसार वापरा.
काकडी आणि पुदिना टोनर
काकडी त्वचेला थंडावा देते आणि पुदिना तेलाचे उत्पादन नियंत्रित करते. हा टोनर बनवण्यासाठी काकडीचा रस काढा, त्यात पुदिन्याचा अर्क टाकून मिश्रण मिक्स करा आणि बाटलीत भरा.
कोरफड आणि ग्रीन टी टोनर
कोरफड आणि ग्रीन टी हे त्वचेला आरामदायी परिणाम देते आणि तेल नियंत्रित करते. तर हा टोनर बनवण्यासाठी तीन चमचे उकळलेले ग्रीन टी दोन चमचे कोरफड जेलमध्ये मिक्स करा आणि कापसाच्या गोळ्याच्या मदतीने त्वचेवर लावा.
या नैसर्गिक DIY टोनरचा वापर करून, तुम्ही तुमची त्वचा ताजी, तेलमुक्त आणि निरोगी बनवू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
