कोरोना काळात अशाप्रकारे वाढवा इम्युनिटी, संक्रमणाचा धोका कमी होईल !

देशामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी स्वत: ची आणि कुटुंबाची काळजी घेणे महत्वाचे आहे.

कोरोना काळात अशाप्रकारे वाढवा इम्युनिटी, संक्रमणाचा धोका कमी होईल !
फूड

मुंबई : देशामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी स्वत: ची आणि कुटुंबाची काळजी घेणे महत्वाचे आहे. कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी आपण पौष्टिकतेने परिपूर्ण आहार घ्यावा. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली तर आपल्याला कोरोनाचा संक्रमणाचा धोका कमी होतो. म्हणून या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. (Special tips to boost immunity during the corona period)

हायड्रेटेड
हायड्रेटेड राहण्यासाठी दररोज 8-10 ग्लास पाणी प्या. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे रोगाचा धोका कमी होतो. पाणी आपले शरीर निरोगी आणि हायड्रेटेड ठेवते. शिवाय पाणी आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पनाही करता येणार नाही. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला पाण्याची आवश्यकता असते. पाणी केवळ आपल्या पचनासाठीच नव्हे तर हृदय, फुफ्फुस आणि मेंदूच्या कार्यासाठी देखील खूप महत्वाचे आहे.

चांगली झोप घ्या
दररोज 7 ते 8 तास झोप घ्या. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. कमी झोपेमुळे आपण तणावग्रस्त राहता. यामुळे तुम्हालाही कंटाळा येतो. म्हणून, झोपेचा अभाव देखील आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम करतो.

व्यायाम करा
चांगल्या आहाराबरोबरच तुम्ही नियमित व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे. दररोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. नियमित व्यायामामुळे तुमची चयापचय सुधारते. हे आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत होते. त्याचबरोबर, ताण कमी करण्यासाठी दररोज ध्यान करणे देखील चांगले आहे. हे आपल्याला तणावमुक्त राहण्यास मदत करते.

हेल्ही डाएट
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी हेल्दी डाएट अत्यंत महत्वाचा असतो. मात्र, आपल्याकडे अनेकांना प्रश्न पडतो की, हेल्दी डाएट म्हणजे नेमका कोणता आहार आपण घेतला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला हेल्दी डाएटमध्ये काय घेतले पाहिजे हे सांगणार आहोत आणि सध्याच्या वाढलेल्या कोरोना परिस्थितीमध्ये तर हेल्दी डाएट घेणे महत्वाचे झाले आहे. कारण हेल्दी डाएटमुळे आपण आजारांना आपल्यापासून दूर ठेऊ शकतो.

शक्यतो कमी कार्ब असलेले जेवण खा. यामुळे रक्तदाब आणि साखर पातळी नियंत्रणात राहील. प्रथिनेयुक्त आहार शरीरास तंदुरुस्त ठेवतो. बीटा कॅरोटीन, एस्कॉर्बिक अॅसिड आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वे समृध्द भाज्या आणि फळे नियमितपणे खा. ब्रोकोली, पालक आणि मशरूम, टोमॅटो, मिरची यासारख्या हिरव्या भाज्या खा. हे संक्रमणाविरूद्ध लढायला मदत करेल.

तुम्ही आपल्या आहारात आले, आवळा, हळद, लसूण, तुळशीची पाने आणि काळ्या जिरेचा समावेश करू शकता. हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. याशिवाय सूर्यफूल बिया, फ्लेक्स बियाणे, भोपळ्याचे बियाणे आणि खरबूज यासारख्या बिया आणि काजू आहारात घ्या. यात प्रथिने आणि व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असतात.

संबंधित बातम्या : 

(Special tips to boost immunity during the corona period)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI