Skin Care : चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की करून पाहा, वाचा!

| Updated on: Jun 08, 2021 | 8:00 AM

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केली जातात. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो.

Skin Care : चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय एकदा नक्की करून पाहा, वाचा!
चेहऱ्यावरील काळे डाग
Follow us on

मुंबई : चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केली जातात. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. हे डार्क स्पॉट्स अर्थात काळे डाग काढून टाकण्यासाठी बर्‍याच प्रकारची उत्पादने बाजारात आहेत. मात्र, याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. अशावेळी आपण घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील काळे डाग दूर करू शकतो. (Special tips to remove dark spots on face)

बटाटा

चेहऱ्यावरील काळे डाग काढून टाकण्यासाठी बटाटे अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी, आपल्याला बटाटा कापून काळ्या डागांवर अर्धा तास ठेवावा लागेल. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. बटाट्याचा रस काढून त्यामध्ये मध मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे देखील चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होईल.

ओट्स

ओट्स जसे आरोग्यासाठी फायदेशीर असतात, तसे त्वचेसाठीही फायदेशीर आहेत. चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी आपण ओट्स वापरू शकतो. ओट्स बारीक करून त्यात 1-2 चमचे लिंबाचा रस मिसळावा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या त्वचेवर स्क्रब करा. 15 मिनिटे तसेच सोडा आणि कोमट पाण्याने धुवा.

कोरफड जेल

जर आपल्याला चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असतील कोरफड जेल लावा. कोरफडच्या जेलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेचे डाग वेगाने कमी करतात. आपण ते थेट कोरफडचा गर काढून देखील आपल्या चेहऱ्याला लावू शकतो. या व्यतिरिक्त कोरफडचे जेल देखील बाजारात उपलब्ध आहे.

लिंबाचा रस

लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे काळे डाग कमी करण्यास मदत करते. चेहऱ्यावरील काळे डाग मुक्त करण्यासाठी चेहऱ्यावर लिंबू लावा आणि काही सेकंद तसेच सोडा. मग पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा उपाय दररोज करा यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग गायब होतील.

केळी

केळीची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण केळीची साल वापरू शकता. यासाठी 3 चमचे साखर, ओटचे पीठ, केळीच्या सालाची पूड घ्या. आता या तीन गोष्टी ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!

(Special tips to remove dark spots on face)