AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रिजमध्ये भाज्यांच्या शेजारी स्पंज ठेवल्यास काय होतं? तुम्हाला माहितीये? जाणून घ्या फायदे

आपण आठवड्याच्या भाज्या आणतो आणि फ्रिजमध्ये ठेवतो. पण काही भाज्या आठवडाभर राहत नाहीत. फ्रिजमध्ये भाज्यांच्या शेजारी स्पंज ठेवल्याने काय होतं फार कोणाला माहिती नसेल, तर जाणून घ्या त्याचे फायदे...

फ्रिजमध्ये भाज्यांच्या शेजारी स्पंज ठेवल्यास काय होतं? तुम्हाला माहितीये? जाणून घ्या फायदे
| Updated on: May 11, 2026 | 3:52 PM
Share

शहरांपासून गावापर्यंत आज प्रत्येकाच्या घराक फ्रिज आहे. फ्रिज आता काळाची गरज झाली आहे, असं म्हणायला देखील हरकत नाही… अनेक गोष्टी फ्रिजमध्ये व्यवस्थित राहतात. सांगायचं झालं तर, आपण आठवडाभरासाठी पुरेशा भाज्या आणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण दोन दिवसांच्या आतच, भाज्या कोमेजलेल्या, हिरव्या मिरच्या मऊ झालेल्या किंवा टोमॅटो सडलेले दिसू लागतात. फ्रिज कितीही महाग असला तरी, ही समस्या अनेक लोकांना सतावते. मात्र, यावर उपाय म्हणून एक सोपी किचन टीप सध्या व्हायरल होत आहे. ती म्हणजे कोरड्या स्पंजची युक्ती. तर जाणून घ्या कसा कराल स्पंजचा वापर.

भाज्या खराब होतात कारण…

बऱ्याच लोकांना वाटतं की फ्रिजचं तापमान कमी असले तरी भाज्या खराब होत नाहीत. पण आर्द्रतेमुळे भाज्या खराब होतात. फ्रिजमध्ये, विशेषतः भाजीच्या डब्यात आर्द्रता साचते. या जास्त आर्द्रतेमुळे जिवाणू आणि बुरशी झपाट्याने वाढतात, ज्यामुळे भाज्या कोमेजतात किंवा चिकट होतात. ही आहे कोरड्या स्पंजची जादू.

भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एका सामान्य स्पंजमध्ये पाणी शोषून घेण्याचे आश्चर्यकारक गुणधर्म असतात. जेव्हा तुम्ही तो भाजीपाल्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवता, तेव्हा तो काय करतो ते येथे दिलं आहे.

आर्द्रता नियंत्रण: स्पंज बॉक्समध्ये साचलेला अतिरिक्त ओलावा त्वरित शोषून घेतो. यामुळे भाज्यांच्या सभोवतालचे वातावरण कोरडे राहते आणि त्या जास्त काळ ताज्या राहतात. हा स्पंज फ्रिजमधील विविध पदार्थांचा वास देखील शोषून घेतो आणि दुर्गंधी कमी करतो.

स्वच्छ करण्यास सोपे: यामुळे ड्रॉवरच्या तळाशी पाणी साचणे यांसारख्या समस्या टळतात, ज्यामुळे फ्रिज स्वच्छ करणे सोपे होते. आता जाणून घ्या याचा वापर कसा कराल…

सर्वप्रथम एक नवीन कोरडा स्पंज घ्या. स्पंज कोपऱ्यांमध्ये किंवा भाजीच्या ड्रॉवरच्या शेजारी ठेवा. फ्रिजमधील आर्द्रता खूप जास्त असल्यास, तुम्ही दोन स्पंजदेखील वापरू शकता. स्पंज भाज्यांवर थेट ठेवू नये, तो फक्त बाजूला ठेवावा.

हे कोणत्या भाज्यांसाठी सर्वोत्तम आहे?

स्पंज पालक आणि कोथिंबीर यांसारख्या हिरव्या भाज्या, तसेच स्ट्रॉबेरी, काकडी, गाजर आणि ढोबळी मिरची जास्त काळ ताजी ठेवण्यास मदत करू शकते. महागडी भांडी किंवा विशेष पिशव्या विकत न घेता, तुम्ही फक्त पाच रुपयांच्या स्पंजने ही समस्या सोडवू शकता.

Follow Us
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...