AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑफीसमध्ये बसून काम केल्याने आखडलं शरीर ? स्ट्रेचिंग करा आणि व्हा रिलॅक्स

ऑफीसमध्ये तासनतास खुर्चीत बसून काम केल्याने शरीर आखडतं. पाठदुखी, मानदुखीने आपण त्रस्त होतोो. अशावेळी काही साध्या-सोप्या उपायांनी आखडलेलं शरीर रिलॅक्स करू शकतो.

ऑफीसमध्ये बसून काम केल्याने आखडलं शरीर ? स्ट्रेचिंग करा आणि व्हा रिलॅक्स
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jul 18, 2022 | 4:02 PM
Share

How to relax Stiff Spine in Office : ऑफीसमध्ये (Office work)लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर बराच काळ बसून काम करणे अतिशय थकवणारे असते. तासनतास एकाच जागी बसून काम केल्याने शरीर आखडतं (stiff body). पाठदुखी, खांदेदुखी, मानदुखी अशा वेगवेगळ्या समस्या भेडसावू लागतात. त्यामुळे रिलॅक्स होऊन चांगले काम करणे अधिकच कठीण होते. घरी जाऊन व्यायाम अथवा योगासने करण्यास सगळ्यांनाच वेळ मिळतो असेही नाही. रिलॅक्स होण्यासाठी दरवेळेस बाहेर जाऊन पाय मोकळं करणं शक्य नसतं. त्यामुळे शरीरातील दुखणं अजूनच वाढतं. अशावेळी खुर्चीवर बसल्या बसल्याच काही साधे सोपे व्यायाम, स्ट्रेचिंग (stretching exercise)केलं तरी बराच फरक पडू शकतो. यासाठी फारसा वेळही लागत नाही. अवघ्या काही मिनिटांच्या स्ट्रेचिंगमुळे शरीरातील स्नायू रिलॅक्स होतात आणि पाठ, मान, खांदेदुखी कमी होण्यास मदत होते.

आखडलेलं शरीर असं करा रिलॅक्स

ऑफीसमध्ये बराच काळ खुर्चीवर बसून काम करावे लागते. सतत एकाच पोश्चरमध्ये बसल्याने अंग आखडतं. तासनतास बसून राहिल्याने पाठ, हात आणि मान खेचल्यासारखी वाटत असेल किंवा हाडे दुखत असतील तर थोडा वेळ खुर्ची मागे करून स्ट्रेचिंग करावे.

काय म्हणतात तज्ज्ञ

योगासने तज्ज्ञ शीतल तिवारी यांनी या संदर्भात इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आखडलेलं शरीर, पाठीचा मणका कशा पद्धतीने रिलॅक्स करावा, त्यासाठी स्ट्रेचिंग कसे करावे, हे त्यात दाखवण्यात आले आहे. यामुळे शरीर तर सैलावतंच पण मनही रिलॅक्स झाल्याने ताण कमी होतो. तसेच पाठदुखीचा त्रासही कमी होतो.

असे करा स्ट्रेचिंग

– सर्वात पहिले खुर्चीवर ताठ बसा आणि पायांचे तळवे जमिनीवर पूर्णपणे टेकवा. – आता दोन्ही हातांचे तळवे एकमेकांमध्ये गुंफून वरच्या बाजूला स्ट्रेच करा. – नंतर दोन्ही हात (एकमेकांमध्ये गुंफलेल्या अवस्थेतच) पुढच्या बाजूला स्ट्रेच करा आणि तसेच मागच्या बाजूलाही खेचा. – आता दोन्ही एकमेकांमधून सोडवा आणि हात मागच्या बाजूला वरती खेचा. तुमची मानही वरच्या बाजूला स्ट्रेच करा आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. – थोड्या वेळाने दोन्ही हात तुमच्यासमोरील डेस्कवर ठेवा. मान जमिनीच्या दिशेने खाली करा आणि पाठीचा कणा ताठ ठेवत स्ट्रेच करा. – हे स्ट्रेचिंग दिवसातून 2 ते 3 वेळा केल्यास आखडलेलं शरीर सैलावायला मदत होईल. आणि पाठीचा, मानेचा त्रास कमी होऊन ऑफीसचे काम अधिक कार्यक्षमतेने करता येईल.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...