कोंड्याच्या समस्येने त्रस्त आहात? लिंबासह ‘या’ पदार्थाचे मिश्रण देईल कोंड्यापासून मुक्ती
केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या सामान्य आहे. अनेकांना याचा त्रास होतो आणि लवकरच यातून सुटका हवी असते. जर तुम्हालाही कोंडा दूर करायचा असेल तर महागडे उत्पादने वापरण्याऐवजी तुम्ही लिंबू मध्ये फक्त एक गोष्ट मिसळून केसांना लावू शकता. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

आजकाल कोंडा ही एक सामान्य समस्या बनली आहे. खराब जीवनशैली, प्रदूषण, रासायनिक उत्पादने आणि खाण्याच्या अनियमित सवयीमुळे कोंड्याची समस्या वाढली आहे. यामुळे केसांचे आरोग्य तर बिघडतेच पण खाज येणे, केस गळणे यासारख्या समस्याही वाढू शकतात. डोक्यातील कोंड्यापासून मुक्त होण्यासाठी लोक महागड्या शाम्पू आणि उपचारांचा अवलंब करतात परंतु प्रत्येक वेळी त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. जर तुम्ही ही कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर जाणून घ्या सोपा घरगुती उपाय जो केवळ प्रभावीच नाही तर खूप किफायतशीर देखील आहे.
कोंड्याची समस्या टाळण्यासाठी लिंबू सर्वात प्रभावी मानले जाते. पण त्यात दही मिसळले तर त्याचा प्रभाव आणखीन वाढतो. या दोन्ही गोष्टी तुमच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतात. या नैसर्गिक गोष्टी तुमची टाळू स्वच्छ करून कोंडा दूर करण्यास मदत करतात. याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊ
कोंडा दूर करण्यासाठी असा करा लिंबू आणि दह्याचा वापर
ताजे दही एका भांड्यात घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. हे मिश्रण नीट फेटून घ्या म्हणजे ते पेस्ट सारखे तयार होईल. यानंतर हे मिश्रण तुमच्या टाळूवर पूर्णपणे लावा. पाच ते दहा मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि वीस ते तीस मिनिटे ते तसेच राहू द्या आणि नंतर केस कोमट पाण्याने धुवा.
लिंबू आणि दही का ठरते फायदेशीर? लिंबू: लिंबू मध्ये नैसर्गिक रित्या सॅट्रिक ऍसिड असते या मुळे कोंडा होण्यास जबाबदार असलेल्या बुरशीचा नाश होतो. लिंबू टाळू स्वच्छ ठेवते. लिंबू मध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे संक्रमण होण्यापासून बचाव करतात.
दही: दह्यामध्ये लैक्टिक ऍसिड असते जे टाळूला आद्रता देते आणि कोरडेपणा कमी करते. हे केस मऊ आणि चमकदार बनवते. तसेच दह्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे टाळूचे आरोग्य सुधारते.
लिंबू आणि दह्याचे फायदे
कोंड्यापासून आराम: ज्यांना कोंड्याची समस्या आहे त्यांनी लिंबू मिसळून दही लावावे. याच्या नियमित वापराने कोंड्याची समस्या दूर होते.
खाज येणे थांबते: कोंडा झाल्यामुळे डोक्याला खाज येण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पण लिंबू आणि दही वापरल्याने खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
केसांची वाढ होण्यास मदत: केसांच्या अनेक समस्यांमुळे त्यांची वाढ ही मंदावते. पण केसांना लिंबू आणि दही लावल्यास डोक्याची छिद्रे उघडून त्यांची वाढ होण्यास मदत होते.
मऊ आणि चमकदार केस: हे मिश्रण केसांमधला कोंडा तर कमी करतेच पण त्यासोबतच केसांना खोल पोषण देऊन ते चमकदार आणि मऊ बनवते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)