AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Regime | रुक्ष आणि निस्तेज त्वचेसाठी रामबाण उपाय ‘टी ट्री ऑईल’, वाचा याचे फायदे…

टी ट्री ऑईलचा वापर अँटी डँड्रफ शॅम्पू, परफ्यूम, हँडवॉशेससह अनेक त्वचेच्या उत्पादनांमध्येही केला जातो. टी ट्री तेलाचा वापर केल्याने त्वचेची जळजळ आणि इतर समस्याही कमी होतात.

Skin Regime | रुक्ष आणि निस्तेज त्वचेसाठी रामबाण उपाय ‘टी ट्री ऑईल’, वाचा याचे फायदे...
‘टी ट्री ऑईल’
| Updated on: Feb 10, 2021 | 1:21 PM
Share

मुंबई : हिवाळ्याच्या काळात आपण सगळेच कोरड्या व निर्जीव त्वचेच्या समस्येने त्रस्त होतो. याशिवाय धूळ, सूर्यप्रकाश आणि बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. यामुळे, चेहऱ्यावर काळे डाग, पिटकुळ्या आणि मुरुमांचा त्रास उद्भवण्यास सुरुवात होतो. ‘टी ट्री ऑईल’ हे या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी एकमेव रामबाण औषध आहे (Tea Tree oil Benefits for flawless glowing skin).

‘टी ट्री ऑईल’ हे त्वचेच्या समस्येसा बराच काळ दूर ठेवण्यासाठी वापरले जाते. आजकाल टी ट्री ऑईलचा वापर अँटी डँड्रफ शॅम्पू, परफ्यूम, हँडवॉशेससह अनेक त्वचेच्या उत्पादनांमध्येही केला जातो. टी ट्री तेलाचा वापर केल्याने त्वचेची जळजळ आणि इतर समस्याही कमी होतात. चला तर जाणून घेऊया ‘टी ट्री ऑईल’च्या फायद्यांबद्दल…

मुरुमांच्या समस्या

टी ट्री ऑईल बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक मुरुमरोधक उत्पादनांमध्ये आणि फेस वॉशमध्ये वापरले जाते. या टी ट्री तेलात बेंझोली पेरोक्साइड हा घटक असतो, जो मुरुम कमी करण्यास मदत करतो. मुरुम कमी करण्यासाठी हा एक नैसर्गिक उपचार आहे, ज्यामुळे त्वचेची चामडी निघत नाही किंवा ती लालसरही होत नाही. मुरुमांची समस्या कमी होण्यासाठी कोरफडच्या जेलमध्ये 3 ते 4 थेंब टी ट्री तेल मिसळ आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.

कोरडी त्वचा

हिवाळ्यात कोरड्या आणि निर्जीव त्वचेमुळे एखाद्याला लालसरपणा, खाज सुटणे या समस्यांना सामोरे जावे लागते. हे टी ट्री तेल त्वचेच्या कोरडेपणाच्या समस्येपासून मुक्त मिळवण्यासाठी वापरले जाते. तुम्ही टी ट्री ऑईलला नारळ, तीळ किंवा इतर कोणत्याही तेलात मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. असे केल्याने तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार दिसेल (Tea Tree oil Benefits for flawless glowing skin).

तेलकट त्वचा

तेलकट त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी टी ट्री तेल वापरले जाते. नारळाच्या तेलाच्या एक तृतीयांश भागामध्ये चहाच्या झाडाचे तेल घाला. दररोज याचा उपयोग केल्याने आपल्या त्वचेवरील पोर्स कमी होतात. तेलकट त्वचा आणि मुरुमांचे मुख्य कारण ही पोर्स आहेत.

फोड

आपल्या शरीरावर एखादा फोड आल्यास त्यावर टी ट्री ऑईल लावणे खूप चांगले आहे. तुमचे ओठ कोरडे किंवा फुटल्यासही तुम्ही याचा वापर करू शकता. तुमच्या त्वचेला निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास हे तेल खूप मदत करते.

कांजण्यांचे डाग

चिकनपॉक्स म्हणजेच कांजण्या या वेरिसेला जोस्टर नामक व्हायरसमुळे होतात. हा एक संसर्गजन्य रोग आहे. जो सर्दी आणि फ्लूसारखा पसरतो. या रोगाचा प्रभाव 10 ते 21 दिवस राहतो. चिकनपॉक्समुळे त्वचेवर काळे-लाल डाग पडतात. ज्यामुळे जळजळ होते आणि रूग्णाला खाज असह्य होते. या काळ्या डागांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही टी ट्री तेलाचा वापर करू शकता. या समस्येवरही टी ट्री तेलातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण उपयोगी पडतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Tea Tree oil Benefits for flawless glowing skin)

हेही वाचा :

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.