Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुर्ज खलिफा इमारतीमधील लिफ्ट रॉकेटसारखी वर जाते; स्पीड जाणून चक्कर येईल

बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच आणि महागडी इमारत आहे. मात्र या इमारतीची लिफ्ट ही जगातील सर्वात वेगवान लिफ्टपैकी एक आहेत, ही लिफ्टचा स्पीड हा एखाद्या रॉकेटसारखा आहे. या लिफ्टचा स्पीड जाणून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल.

बुर्ज खलिफा इमारतीमधील लिफ्ट रॉकेटसारखी वर जाते; स्पीड जाणून चक्कर येईल
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 12:30 PM

दुबई म्हंटल की सगळ्याच बाबतीत आकर्षण. अगदी इमारतींपासून ते तेथील लाईफस्टाईल पर्यंत. त्यात दुबईतील बुर्ज खलिफा ही इमारत म्हणजे दुबईची खरी ओळख म्हंटल तर चुकीच ठरणार नाही. बुर्ज खलिफा ही जगातील सगळ्यात उंच इमारत आहे. तसेच बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात महागडी इमारत म्हणूनही ओळखली जाते. 163 मजल्यांची बुर्ज खलिफा ही थेट आकाशाला भिडणारी आहे.

बुर्ज खलिफाची लिफ्ट जगातील सर्वात वेगवान लिफ्ट

बुर्ज खलिफाची उंची एवढी आहे की तुम्हला ती नव्वद किलोमीटर अंतरावरूनही ही इमारत दिसते. बरं जगात फक्त या इमारतीचीच नाही तर या इमारतीमधील लिफ्टचीही तेवढीच चर्चा आहे. कारण बुर्ज खलिफामधील लिफ्ट ही जगातील सर्वात वेगवान लिफ्ट मानली जाते. बुर्ज खलिफामधील लिफ्टची खासियत म्हणजे या लिफ्टचा स्पीड. ही लिफ्ट रॉकेटच्या स्पीडने वर जाते,म्हणजे ही लिफ्ट 59 सेकंदात 124 थेट माळ्यावर पोहचते. हे जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल.

 लिफ्टचा नेमका स्पीड जाणून चक्कर येईल

बुर्ज खलिफामध्ये 58 लिफ्ट आहे.बुर्ज खलिफामधील लिफ्ट दहा मीटर प्रति सेकंद वेगाने हलते. ताशी 36 किमी वेगाने ही लिफ्ट वर जाते. या लिफ्टला इमारतीच्या 124 व्या मजल्यावर असलेल्या ‘अ‍ॅट द टॉप’ या डेकवर पोहोचण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागतात. ‘अ‍ॅट द टॉप’ या डेकवरुन दुबई शहराचे डोळे दिपवणारं दृष्य पहायला मिळतं.

लिफ्टमध्ये एकाच वेळी 12 ते 14 लोक जाऊ शकतात

ओटिस कंपनीने बुर्ज खलिफामध्ये लिफ्ट बनवल्या आहेत. या लिफ्टमध्ये एकाच वेळी 12 ते 14 लोक जाऊ शकतात. इमारत सेवा तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी बसवण्यात आलेली लिफ्ट एका वेळी 5500 किलो सामान वाहून नेऊ शकते. ही जगातील सर्वात उंच सर्व्हिस लिफ्ट आहे. यासह बुर्ज खलिफामधील ही जगातील तिसऱ्या क्रमाकांची वेगवान लिफ्ट आहे.

या 2 इमारतींच्या लिफ्टचा स्पीड बुर्ज खलिफापेक्षा जास्त

जगात आणखी अशा दोन इमारती आहेत ज्यांचा लिफ्टचा वेग बुर्ज खलिफा पेक्षा जास्त आहे. तैवानमध्ये तैपेई नावाची एक इमारत आहे जिथे जगातील सर्वात वेगवान लिफ्ट आहे. ही इमारत 509 मीटर उंच आहे. त्यामध्ये बसवलेल्या लिफ्टचा वेग 1010 मीटर/मिनिट आहे. याचा अर्थ या लिफ्टचा वेग ताशी 60.6 किमी आहे.

तर दुसऱ्या क्रमांकावर योकोहोमा लँडमार्क टॉवर येतो. ही इमारत 296 मीटर उंच आहे. त्यामध्ये बसवलेल्या लिफ्टचा वेग 750 प्रति मिनिट आहे. म्हणजेच या लिफ्टचा स्पीड ताशी 45 किमी इतका आहे.

म्हणून बुर्ज खलिफा पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन 

अशा अनेक कारणांमुळेच बुर्ज खलिफा पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन असतं. बुर्ज खलिफा इमारत इस्लामिक स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बुर्ज खलिफामध्ये 2957 पार्किंग स्पेस आणि 900 अपार्टमेंट आणि 304 हॉटेल्स आहे. त्यामुळे तुम्ही कधी दुबईला गेलात तर बुर्ज खलिफा इमारतीच्या सुंदरतेचा आणि या इमारतीमधील लिफ्टचा थ्रीलिंग अनुभव घ्यायला विसरू नका.

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.