कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 30 हजारांवर, डॉक्टर म्हणाले तर येऊ शकते दुसरी लाट
corona cases : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढू नये म्हणून लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारी व्यक्तींनी घरीच राहण्याच्या सूचना ही डॉक्टरांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रण अलर्ट आहेत. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे.

Corona Cases : गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सिंगापूरमधील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढू लागल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने सर्वांना सतर्क केले आहे. कारण कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे सिंगापूरच्या रुग्णालयांवर दबाव येत आहे. लोकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ़ संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे परंतु महामारीच्या काळा इतकी नाही. वाढत्या संसर्गासाठी कोरोनाचा कोणता नवीन प्रकार कारणीभूत आहे का हे अजून स्पष्ट झालेले नाही.
मास्क घालण्याचे आवाहन
सिंगापूरमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लोकांना लसीकरण करुन घेण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून आधीच उपाययोजन केल्या जात आहेत.
स्ट्रेट्स टाईम्सने मंगळवारी दिलेल्या अहवालानुसार, श्वसनाच्या संबधित संक्रमणामध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इन्फ्लूएंझाची लागण झालेल्या लोकांची वास्तविक संख्या तुलनेने कमी आहे, बहुसंख्य लोकांना सामान्य सर्दीची तक्रार आहे.
देशातील वाढत्या कोरोनाच्या आकड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 32,000 हून अधिक लोकांना कोविड -19 चे निदान झाले आहे, त्यापैकी सुमारे 460 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर नऊ जणांना अतिदक्षता विभागाद दाखल करण्यात आले आहे. वाढते प्रकरणं पाहता सार्वजनिक रुग्णालयांमध्येही खाटांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे.
वर्षाच्या अखेरीस वाढतात रुग्ण
सिंगापूरमधील संसर्गजन्य रोग तज्ञ यांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आम्ही गेल्या काही वर्षांपासून श्वसन संक्रमणाची अधिक प्रकरणे पाहत आहोत, साधारणपणे वर्षाच्या अखेरीस. या वर्षी श्वसनमार्गाच्या संसर्गाच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. पण बहुतेक प्रकरणे सौम्य असल्याने त्यांच्यावर बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचार केले जाऊ शकतात.
इन्फ्लूएन्झा आणि COVID-19 लसीकरण वाढवण्याबरोबरच, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, आजारी असताना घरी राहणे महत्त्वाचे आहे. दुसरी लाट रोखण्यासाठी सावध राहण्याची गरज आहे.
