Diwali 2020 | दिवाळीत ‘ड्रायफ्रुट्स’ खरेदी करताय? ‘या’ गोष्टी नक्की लक्षात घ्या!

बऱ्याचदा लोक फराळ किंवा मिठाईऐवजी ड्रायफ्रुट्स (Dry Fruit) अर्थात सुकामेवा भेट म्हणून देणे पसंत करतात.

Diwali 2020 | दिवाळीत ‘ड्रायफ्रुट्स’ खरेदी करताय? ‘या’ गोष्टी नक्की लक्षात घ्या!
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 1:46 PM

मुंबई : दिवाळी (Diwali 2020) जवळ आली की घरोघरी फराळ आणि मिठाई बनवायला सुरुवात होते. बऱ्याचदा लोक फराळ किंवा मिठाईऐवजी ड्रायफ्रुट्स (Dry Fruit) अर्थात सुकामेवा भेट म्हणून देणे पसंत करतात. सध्या बाजारात वेगवेगळ्या आकारात आणि सुंदर पॅकेजिंगमध्ये ड्रायफ्रुट्स विक्रीला आले आहे. सणासुदीच्या काळात मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना भेट स्वरुपात हे ड्रायफ्रुट बॉक्स देण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे (The things we need to keep in mind while shopping dry fruits in Diwali).

दुसरे म्हणजे दिवाळी दरम्यान बऱ्याचदा मिठाईत भेसळीच्या बातम्या समोर येत असतात. भेसळयुक्त मिठाई आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अशावेळी मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना भेट म्हणून देण्यासाठी मिठाईला पर्याय म्हणून ड्रायफ्रुट्स महत्त्वाचे ठरतात. महाग असले तरी ड्रायफ्रुट्स शरीरासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप पौष्टिक आहेत.

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने सुक्यामेव्यातही भेसळीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. अशा वेळी ड्रायफ्रुट्स खरेदी करताना आपली किंवा आपल्या प्रियजनांची फसवणूक होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत (The things we need to keep in mind while shopping dry fruits in Diwali).

रंग तपासा

चांगले ड्रायफ्रुट्स खरेदी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचा रंग तपासणे. जर ड्रायफ्रुट्सचा रंग त्याच्या नैसर्गिक रंगापेक्षा जास्त गडद असेल तर, याचा अर्थ असा की ते ड्रायफ्रुट खराब झाले आहेत. त्यामुळे गडद रंग असणारे ड्रायफ्रुट्स खरेदी करू नये.

चावून बघा

जर ड्रायफ्रुट्स काही वेळ पाण्यात ठेवून नंतर सुकवले तर, ते चावण्यास कडक होतात. याचाच अर्थ असा की ते ड्रायफ्रुट्स खूप जुने असून, नव्याने विकण्याकरता फ्रेश असल्याचे भासवले जात आहे. अशी ड्रायफ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात (The things we need to keep in mind while shopping dry fruits in Diwali).

दुर्गंधी

ड्रायफ्रुट्स खरेदी करताना त्याचा वास घेऊन नक्की पाहा. जर त्यांना उग्र वास येत असेल तर टे ड्रायफ्रुट्स जुने आहेत. तसेच त्यांची योग्य ठिकाणे ठेवले नसावे. ड्रायफ्रुट्स जर व्यवस्थित योग्य ठिकाणी ठेवले नाहीत, तर त्यात ओलावा निर्माण होतो आणि त्यातून वास येऊ लागतो. अशावेळी या ड्रायफ्रुट्समध्ये अळी अथवा बुरशीजन्य घटक तयार होऊ शकतात. त्यामुळे असा सुकामेवा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

तारीख

बहुतेक लोक स्थानिक दुकानदारांकडून सुटे ड्रायफ्रुट्स खरेदी करतात. त्यावर तारीख निर्देशित नसते. अशावेळी ते ड्रायफ्रुट्स खाण्यास योग्य की अयोग्य हे ठरवणे कठीण होते. त्यामुळे एफएसएसएआय मार्गदर्शक तत्त्वे निर्देशित असणारे ड्रायफ्रुट्स खरेदी करावेत. अशा पॅकेटवर मॅन्युफॅक्चरिंग तारीख लिहिलेली असते, जेणेकरून काही चुकीचे वाटल्यास ग्राहक मंचाकडे जाऊन तक्रार करता येते.

पॅकेटवरील माहिती

ड्रायफ्रूटचे पॅकेट विकत घेतेवेळी त्यामागील माहिती नक्की वाचा. जर त्यामध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रिजर्वेटिव्हचे नाव लिहिले गेले असेल तर, ते ड्रायफ्रुट्स खरेदी करु नका.

(The things we need to keep in mind while shopping dry fruits in Diwali)

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.