AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाश्त्यात ‘हा’ पांढरा पदार्थ खाल्ल्याने लिव्हर खराब होऊ शकते, तुम्ही ते खाण्याची चूक करत आहात का?

नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा भाग असतो. पण तुम्हाला माहितीये का की, नाश्त्यात खाल्लेला हा पांढरा पदार्थ लिव्हरसाठी किती हानिकारक असू शकतो ते. तो कोणता पदार्थ आहे?चला जाणून घेऊयात.

नाश्त्यात 'हा' पांढरा पदार्थ खाल्ल्याने लिव्हर खराब होऊ शकते, तुम्ही ते खाण्याची चूक करत आहात का?
white bread Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2025 | 6:50 PM
Share

सकाळची सुरुवात अनेकदा गरम चहा, ताजी फळे आणि हलका नाश्ता याने होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की नाश्त्यात तुम्ही जे पदार्थ मोठ्या उत्साहाने खात आहात ते तुमच्या शरीरासाठी किती फायदेशीर असतात. कारण सकाळी नाश्त्यात खाल्ला जाणारा एक असा पदार्थ ज्यामुळे लिव्हर खराब होऊ शकतं. विशेषतः ही पांढरी गोष्ट, जी दिसायला निरुपद्रवी दिसते, परंतु हळूहळू तुमच्या लिव्हरला हानी पोहोचवू शकते. चला जाणून घेऊया तो पांढरा पदार्थ कोणता आहे? हा पदार्थ तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकतो ते.

हा पदार्थ लिव्हरसाठी धोकादायक ठरू शकतो

बरेच लोक नाश्त्यासाठी जलद आणि सोपा पर्याय म्हणून पांढरा ब्रेड निवडतात. तो बटर किंवा जॅमसोबत खायला सगळ्यांनाच आवडतो. पण रिफाइंड पिठापासून बनवलेला पांढरा ब्रेड तुमच्या लिव्हरसाठी खरोखर धोकादायक ठरू शकतो.

हा पदार्थ हानिकारक का आहे?

रिफाइंड कार्ब्स : पांढरा ब्रेड हा रिफाइंड पिठापासून बनवला जातो ज्यामध्ये फारसे फायबर नसते आणि तो रिफाइंड कार्ब्सचे भांडार असते. जेव्हा तुम्ही हा ब्रेड खाता तेव्हा तो शरीरात साखरेसारखा विरघळतो किंवा त्याच स्वरुपात कार्य करतो. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते.

फॅटी लिव्हरचे कारण: रिफाइंड कार्ब्सचे सतत सेवन केल्याने लिव्हरमध्ये चरबी जमा होते, ज्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग म्हणतात.

इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवते: जास्त प्रमाणात पांढरा ब्रेड खाल्ल्याने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते, ज्यामुळे टाइप 2 मधुमेह आणि लिव्हरच्या समस्या उद्भवू शकतात.

लिव्हरवर परिणाम करणारी लक्षणे

थकवा जाणवणे

पोटात सूज येणे किंवा जडपणा येणे

त्वचेवर पिवळेपणा येणे

भूक न लागणे

शरीरात अशक्तपणा येणे

पांढऱ्या ब्रेडऐवजी काय खावे?

नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा भाग आहे आणि त्यात एक छोटीशी चूक देखील तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकते. जर तुम्हीही ते दररोज खात असाल तर आता तुमची सवय बदलण्याची वेळ आली आहे. कारण निरोगी दिवसाची सुरुवात योग्य नाश्त्याने झाली पाहिजे, असा नाश्ता जो तुमचे लिव्हर आणि संपूर्ण शरीर तंदुरुस्त आणि चपळ ठेवेल. म्हणजेच तुम्ही सकाळी लवकर ओट्स, पोहे किंवा पनीर पराठा खाऊ शकता. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.