Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुतांश पुरुष गर्लफ्रेंड आणि पत्नीशी बोलतात खोटं, देतात ‘ही’ 8 कारणं

बऱ्याच वेळा लोकं रिलेशनशिपमध्ये आपल्या जोडीदाराशी खोटं बोलताना दिसतात. खोट बोलण्याची अनेक कारणे असू शकतात. कधी जोडीदार दुखावू नये म्हणून खोटं सांगितलं जातं तर कधी स्वत:चाच मुद्दा खरा करण्यासाठीही खोट बोलण्याचा आधार घेतला जातो.

बहुतांश पुरुष गर्लफ्रेंड आणि पत्नीशी बोलतात खोटं, देतात 'ही' 8 कारणं
Love StoryImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 3:59 PM

महिला असोत वा पुरुष, लहान असो वा मोठे सगळे जण कधी ना कधीतरी खोटं (Lying) बोलतातच. खोटं बोलणं ही एक मानवी वृत्ती असते. कधीकधी एखाद्या अवघड परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी खोटं बोललं जात. तर काही जण खरी गोष्ट लपवण्यासाठी खोटं बोलतात. आपली चूक पकडली जाऊ नये म्हणून समोरच्याला खोटं सांगितलं जात. काही लोक तर असे असतात, जे काही कारण नसतानाही खोटं बोलतात. बऱ्याच वेळा लोकं रिलेशनशिपमध्ये (relationship) आपल्या जोडीदाराशी खोटं बोलताना दिसतात. खोटं बोलण्याची अनेक कारणे असू शकतात. कधी जोडीदार दुखावू नये म्हणून खोटं सांगितलं जातं तर कधी स्वत:चाच मुद्दा खरा करण्यासाठीही खोट बोलण्याचा आधार घेतला जातो. आज आम्ही तुम्हाला अशी काही कॉमन खोटी वाक्य सांगणार आहोत, जी बहुतांश पुरूष (men tell theses lies to partner) त्यांच्या जोडीदारांना सांगतात. गर्लफ्रेंड किंवा पत्नीशी ते खोटं बोलतात.

मी सिंगल आहे

बऱ्याच वेळेस अस दिसतं की, एखाद्या रिलेशनशिपमध्ये असतानाही पुरुष दुसऱ्या महिलेकेडे आकर्षित होतात. तेव्हा त्या महिलेशी बोलणं बंद होऊ नये म्हणून सरळ खोटं सांगतात, की मी सिंगल आहे.

मी तिच्याकडे बघत नव्हतो

बऱ्याच वेळेस आपल्या जोडीदारासोबत ( गर्लफ्रेंड अथवा पत्नी) असतानाही पुरुष समोरून जाणाऱ्या दुसऱ्या एखाद्या स्त्रीकडे बघतात. त्यावर जर जोडीदाराने त्यांना टोकले, तर ते ( पुरुष) ती गोष्ट टाळतात. मी तिच्याकडे बघतच नव्हतो, माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं, मी माझ्याच विचारात होतो, असं सर्रास खोटं ते जोडीदाराला सांगतात.

मी कधीच सिगरेट पीत नाही / मी धूम्रपान सोडलं आहे

बऱ्याच वेळा महिला त्यांच्या जोडीदारांना धूम्रपान करण्यास मनाई करतात. त्यामुळे जोडीदाराला भेटायला येण्यापूर्वी थोडा वेळ आधीच जरी धूम्रपान केले असले तरी जोडीदाराने विचारल्यावर पुरूष ती गोष्ट लगेच नाकारतात. मी कधीच स्मोकिंग करत नाही किंवा मी स्मोकिंग करणे सोडले आहे, अशी खोटी बतावणी ते करतात. समोरचा माणूस सिगरेट पीत होता, त्याचा वास माझ्या कपड्यांना लागला, असं खोटंही ते सांगतात.

मी केवळ तुझ्याबद्दल विचार करतो

बऱ्याच वेळा जोडीदाराचे मन जिंकण्यासाठी किंवा तिला वाईट वाटू नये यासाठी पुरुष सरळ त्यांना खोटं सांगतात की, मी फक्त तुझाच विचार करत होतो.

मी तुझ्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही

तुम्ही बऱ्याच वेळेस चित्रपटात पाहिलं असेल की हिरो, हिरॉईनला सांगतो, की मी तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. आणि फोन ठेवल्याक्षणी तो मित्रांसोबत पार्टी करायला सुरूवात करतो. खऱ्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात. पुरूष त्यांच्या जोडीदाराला असंच खोटं सांगून, त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात.

पैशांसंबधी खोटं बोलणं

बऱ्याच वेळेस लग्न होण्यापूर्वी पुरूष त्यांच्या जोडीदाराला खोटं सांगतात, की त्यांच्याकडे खूप पैसा आहे. तर लग्न झालेले पुरुष पैसे असूनही त्यांच्या बायकोशी खोटं बोलतात, की त्यांच्याकडे बिलकूल पैसे नाहीत.

लग्नापूर्वी शरीरसंबंध नाही

बऱ्याच वेळेस आवडलेल्या मुलीचे मन जिंकण्यासाठी पुरूष त्यांना खोटं सांगतात की, लग्नापूर्वी इंटिमेट बिलकूल होणार नाही. मात्र आवडलेल्या मुलीने गर्लफ्रेंड बनण्यास होकार दिला की परिस्थिती लगेच चेंज होते.

तू माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम आहेस

बरेचदा पुरूष त्यांची गर्लफ्रेंड किंवा पत्नीशी असं खोटं बोलताना दिसतात की, आयुष्यात ते एकदाच प्रेमात पडले आणि ती व्यक्ती तूच आहेस. मात्र बऱ्याच वेळेसे ते आपल्या भूतकाळाबद्दल जोडीदाराला कल्पना देत नाही. जोडीदाराला असुरक्षित वाटू नये म्हणून ते त्यांच्याशी खोटं बोलतात.

हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.