AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘का रे दुरावा का रे अबोला’… नात्यांमधील तणाव असा करा दूर..

अनेक वेळा असे प्रसंग येतात की ज्यांचा दूरगामी परिणाम हा नात्यांमध्ये होत असतो. वेळप्रसंगी यामुळे दोन व्यक्तींना कायमचा दुरावादेखील सहन करावा लागत असतो. परंतु हे आपोआप होत नाही. याची लक्षणे दोघांच्या नात्यांमध्ये हळूहळू दिसून येत असतात.

‘का रे दुरावा का रे अबोला’... नात्यांमधील तणाव असा करा दूर..
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 4:22 PM
Share

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये नातेसंबंधांमध्ये (Relationship) आलेल्या तणावामुळे (Depression) ब्रेकअप होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. दोन व्यक्तींमधील मतभेद इतके टोकाला जातात की त्यातून त्यांना एकत्र राहणे शक्यच होत नसते. नात्यातील या ताणाला वेळीच आवर घालता आला पाहिजे. नात्यांमधील दुराव्याची लक्षणे (Symptoms) वेळीच ओळखल्यास त्यावर उपाय योजना करणेही सोपे जात असते. अनेक जोडपी आपल्यातील वाद सोडविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतात. संवाद हरपला की नात्यात दुरावा निर्माण होणे साहजिकच असते. त्यामुळे संवाद हा दोन नाते टिकवण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. दुरावा किंवा नाराजी यामुळे काही वेळा नात्यातील वातावरण इतके बिघडते की जोडीदारांना वेगळे व्हावे लागते. नात्यातील समस्यांमुळे काही वेळा लोकांना नैराश्य येऊ लागते. ते वेगळ्या पद्धतीने वागू लागतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रियजनांपासून वेगळे करणे सुरू होते. या लेखात अशाच काही लक्षणांची माहिती देणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला अशा उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने नातेसंबंधही सुधारता येतील.

एकमेकांना समजून घ्या

अनेक वेळा आपल्या जोडीदाराचे म्हणणे समजून घेण्यास आपण कुठेतरी कमी पडत असतो. अनेक वेळा यातून गैरसमज निर्माण होतात. परिणामी दोन नात्यांमध्ये दुरावा व अबोला निर्माण होत असतो. यावरून वेळप्रसंगी दोघांमध्ये भांडणे निर्माण होत असतात. जोडीदाराला समजून घेण्याऐवजी नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती त्याच्याशी भांडत राहते. या वेळी विषय अधिक न ताणता जोडीदाराचे ऐका आणि त्याला काय म्हणायचे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.

अवास्तव अपेक्षा टाळा

एखादी इच्छा वा अपेक्षा ठेवणे व ती पूर्ण न झाल्यावर नाराजी व्यक्त करणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु अपेक्षांचे ओझे वाढत गेल्यास दोन व्यक्तींमध्ये तणाव निर्माण होत असतो. अशा वेळी जास्त अपेक्षा न ठेवता वास्तवतावादी राहणे महत्त्वाचे असते. ज्या अपेक्षा ठेवायच्या त्या वाजवी असल्या पाहिजे. अपेक्षा पूर्ण न झाल्यास नाराज न होता समोरची परिस्थिती समजून घेतली पाहिजे.

संवाद साधा

नैराश्यामुळे नात्यातील जोडीदारालाही एकटेपणा जाणवू लागतो. आपल्यासोबत कुणीही नाही आपण या जगात एकटे पडलो असल्याची भावना त्याच्यात निर्माण होत असते. अशा वेळी संवाद हा महत्त्वाची भूमिका निभावत असतो. त्यामुळे आपल्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, त्याच्याशी संवाद साधा यातून त्याचे मन हलके होईल. सोबतच तुमच्याबद्दल त्याचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत मिळेल.

सकारात्मक राहा

आपल्या सभोवताली अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात. त्याचा परिणाम दोघांच्या नात्यावरही होत असतो. अशा वेळी नेहमी सकारात्मक राहणे महत्वाचे असते. सकारात्मक उर्जा निर्माण झाल्यास नात्यातील दुरावा कमी होतो. त्यामुळे एकमेकांशी बोलतानाही नेहमी सकारात्मक विषयांवरच चर्चा केली पाहिजे. नकारात्मक गोष्टी आपल्या बोलण्यातून टाळल्या पाहिजे.

संबंधित बातम्या :

चेहऱ्यावरील ग्लो हरवलाय? चंदनापासून तयार फेसपॅक ठरेल परिणामकारक, काळे डागही जातील

Beauty tips : कांद्याचा रस त्वचेला लावा आणि या समस्या दूर ठेवा, वाचा महत्वाची माहीती!

Travel Ideas : शिमलामध्ये फिरण्यासाठी जात आहात? मग ‘ही’ खास बातमी वाचाच!

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.