व्यायाम किंवा चालण्यासाठी वेळ नाही? ‘या’ 5 मार्गांनी करा कॅलरीज बर्न
सर्वांनाच माहित आहे की चालणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पण तुम्हालाही दररोज चालण्याचा कंटाळा आला आहे का? तर तुम्ही काही अॅक्टिव्हिटी करून कॅलरीज बर्न करू शकता. तर या लेखात आपण कॅलरीज बर्न करणाऱ्या कोणत्या अॅक्टिव्हिटी आहेत ते जाणून घेऊया.

आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण चालणे, व्यायाम किंवा योगाची मदत घेतो कारण या पद्धती आपले शरीर नैसर्गिकरित्या निरोगी ठेवतात. व्यायामासाठी वेळ नसेल तर अनेकजण वॉकला जातात. रोज तुम्ही वॉकला गेलात तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहता. 30 मिनिटे चालल्याने 120-150 कॅलरीज बर्न होऊ शकतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की चालणे किंवा व्यायाम न करताही तुम्ही कॅलरीज बर्न करू शकता. असे काही सोपे मार्ग आहेत जे केल्याने तुमच्या कॅलरीज बर्न होतात आणि त्या केल्याने तुमच्या मनालाही शांती मिळते.
जेव्हा तुम्हाला वॉकला जायला कंटाळा आला असेल तर तेव्हा तुम्ही काही मजेदार आणि शांतताप्रिय अॅक्टिव्हिटी करू शकता. तर मग तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणत्या 5 गोष्टी करू शकतात ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊ शकता.
आरोग्यासाठी फायदेशीर या 5 अॅक्टिव्हिटी
लहान मुलांसोबत वेळ घालवणे
लहान मुलांसोबत खेळल्याने तुमचा मूड चांगला होतो. तुम्ही मुलांसोबत अनेक प्रकारचे खेळ खेळू शकता जसे की त्यांच्यासोबत धावणे, नाचणे, या सर्व गोष्टी तुम्हाला 100-150 कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात जे 30 मिनिटांच्या चालण्याइतके आहे.
नृत्य केल्याने कॅलरीज बर्न होतात
जर तुम्हाला वॉकला जायचं नसेल तर तुम्ही घरी तुमचे आवडते गाणे वाजवून त्यावर डान्स करू शकता. यामुळे तुमचा मूड फ्रेश होईल आणि 150-200 कॅलरीज देखील बर्न होतील ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.
बागकाम मनाला शांती देते
झाडे आणि वनस्पती आपल्याला केवळ ऑक्सिजन देण्यास मदत करत नाहीत तर त्यांच्या जवळ बसल्याने आपली नकारात्मकता देखील कमी होते. बागकाम करताना, तुम्ही कुंडी उचलता, कुंडीत रोप लावता, यावेळी तुमचे शरीर वाकते आणि हालचाल होते. असे मानले जाते की या अॅक्टिव्हिटीमुळे 150-200 कॅलरीज बर्न होतात, जे जवळजवळ चालण्याइतकेच असतात.
घराची स्वच्छता
जर तुमचा मुड चांगला राहावा यासाठी आणि कॅलरीजही बर्न करायच्या असतील तर तुम्ही तुमची खोली स्वच्छ करू शकता. या कामात देखील सुमारे 150 कॅलरीज बर्न होतात आणि तुमचा मूड देखील चांगला राहतो.
वाद्य वाजवणे
पियानो, गिटार, ड्रम यांसारखी वाद्ये वाजवल्याने 150 कॅलरीज बर्न होतात जे 30 मिनिटांच्या चालण्याइतके आहे. तथापि त्यात अधिक शारीरिक हालचाल असल्यास ते मूड चांगला ठेवते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)