रात्री झोपेची समस्या सतावत असेल तर ‘हे’ पेये प्या, काही दिवसांतच दिसून येईल परिणाम
रात्री चांगली झोप न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी दिवसभर थकवा जाणवतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मानसिकतेवर होत असतो. तर रात्री चांगली झोप मिळावी यासाठी तुम्ही झोपताना हे पेय नक्की प्या. आजच्या लेखात आपण अशाच काही पेयांबद्दल जाणून घेणार आहोत जे रात्रीचे सर्वोत्तम पेय मानले जाते.

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण कामाच्या बाबतीत खूप तणावात तसेच चिंतेत असतो, तसेच वैयक्तिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळणे अशा अनेक गोष्टींचे दडपण घेऊनआपण जगत असतो. यामध्ये जर रात्री चांगली झोप न मिळाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो आणि अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्या सतावू लागतात. त्यामुळे या सर्वांचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवरही होऊ शकतो. जर तुम्हाला झोपेच्या समस्यापासून आराम मिळवायचा असेल तर आजच्या लेखात काही पेयांबद्दल जाणून घेणार जे तुम्ही सहज बनवू शकाल आणि रात्रीच्या झोपेची चिंता दूर करून गाढ झोप घेऊ शकता.
चांगल्या झोपेसाठी कोमट दूध
कोमट दुध पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण यातील ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन सारखे घटक आढळतात, जे झोप सुधारण्यास मदत करतात. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्यायल्याने मन शांत होते आणि लवकर झोप येण्यास मदत होते. याशिवाय दूध हाडे मजबूत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
कॅमोमाइल चहा देखील उपयुक्त
कॅमोमाइल चहा हा एक हर्बल चहा आहे जो निद्रानाशावर मात करण्यास मदत करते. त्याचे दाहक-विरोधी आणि आरामदायी गुणधर्म मन शांत करतात आणि ताण कमी करतात. झोपण्यापूर्वी ते पिणे हा झोपेचा एक नैसर्गिक उपाय आहे.
हळदीचे दूध झोप आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर
रात्री झोपताना हळदीचे दूध प्यायलास तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतेच असे नाही तर गाढ झोप आणण्यास देखील प्रभावी आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे शरीराला आराम देतात. जर तुम्ही हिवाळ्याच्या दिवसात तसेच पावसाळ्यात हळदीचे दूध सेवन केले तर खोकला आणि सर्दी देखील दूर राहते.
झोप आणि उर्जेसाठी केळी स्मूदी आहे बेस्ट
केळीमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूंना आराम देते, ज्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. दूध आणि केळी यापासून बनवलेली स्मूदी रात्रभर शरीराला ऊर्जा देते आणि सकाळी तुम्हाला ताजेतवाने वाटते.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
