रात्री झोपताना केलेल्या या चुका केस फ्रिजी होण्यास आणि तुटण्यास ठरतात कारणीभूत
केस निर्जीव, फ्रिजी किंवा मधूनच तुटण्यामागे पोषणाचा अभाव हे कारण असू शकते. परंतु रात्री झोपताना केलेल्या काही चुका तुमचे केस फ्रिजी निर्जीव बनवू शकतात आणि केस तुटण्यास देखील कारणीभूत ठरू शकतात.

आपल्यापैकी अनेकांचे केस हे कुरळे, फ्रिजी, दुतोंडी असतात. तर त्या प्रत्येकाला असे वाटत असते की आपले केस सिल्की रेशमी असावे. विशेषतः मुली त्यांच्या केसांबद्दल खूप पझेसिव्ह असतात. कारण निरोगी केस तुमचे व्यक्तिमत्व देखील वाढवतात. केसांची काळजी घेताना चांगल्या क्वॉलिटीचे शॅम्पू, केसांचे तेल आणि कंडिशनर यासारख्या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करतात, परंतु आपण अनेकदा काही छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो ज्यामुळे केस फ्रिजी आणि निर्जीव होतात आणि केस तुटण्यास देखील कारणीभूत ठरू शकतात. तर अशातच अनेकदा रात्री झोपताना केलेल्या काही चुकांमुळे सुद्धा आपल्याला केसांची समस्या उद्भवू लागतात. आजच्या लेखात आपण जाणून घेऊया कोणत्या चुका केल्याने तुमच्या केसांना नुकसान होते.
गरम पाण्याने केस धुणे, हेअर टुल्सचा जास्त वापर करणे, शाम्पू वापरणे, कंडिशनर किंवा तेल न लावणे, प्रखर सूर्यप्रकाशाच्या संर्पकात येणे आणि प्रथिनांची कमतरता यामुळे केस फ्रिजी, निर्जीव आणि दुतोंडी होतात. याशिवाय रात्री झोपताना केसांशी संबंधित काही गोष्टी लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, अन्यथा केस फ्रिजीच नाही तर ते तुटण्यास देखील कारणीभूत ठरू शकतात. चला जाणून घेऊया.
केस घट्ट बांधून झोपणे
आपल्यापैकी अनेक महिलांना केस घट्ट बांधायला आवडतात. तर काहीजण अशी हेअरस्टाईल करतात जी खूप घट्ट असते. तर यामुळे केसांचेही नुकसान होते. कारण केस घट्ट बांधल्याने तुटू लागतात आणि फ्रिजी होतात. तसेच काहींना रात्री झोपताना केसांची घट्ट वेणी बांधून झोपतात. पण असे केल्याने तुमचे केस कमकुवत होऊ लागतात कारण केसांवर ताण येतो.
सुती कापडाचे उशाचे कव्हर
जर तुम्ही सुती कापडापासून बनवलेला उशीचे कव्हर वापरत असाल किंवा कव्हरच्या कापडावर लिंट असेल तर त्यामुळे तुमच्या केसांमध्ये घर्षण होते, ज्यामुळे ते फ्रिजी आणि केसांमध्ये गुंता तयार होऊ लागतात आणि घर्षणामुळे मधूनच तुटू लागतात.
केस पूर्णपणे मोकळे ठेवून झोपणे
जर तुमचे केस लहान असतील तर तुम्ही ते मोकळे ठेवून झोपू शकता, परंतु जर तुमचे केस लांब असतील तर केस मोकळे ठेवून झोपल्याने केसांमध्ये गुंता तयार होतात आणि त्यामुळे केस गळती वाढू शकते.
ओल्या केसांनी झोपणे
अनेकांना रात्री आंघोळ करण्याची सवय असते आणि जर तुम्ही तुमचे केस धुतले तर झोपण्यापूर्वी ते पूर्णपणे सुकवावेत. जर तुम्ही केस ओले ठेऊन झोपल्यास तुमचे केस तर खराब होतातच पण डोकेदुखी आणि सर्दी सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
झोपताना केसांची काळजी
जर तुमचे केस लांब असतील तर रात्री झोपताना केस पूर्णपणे मोकळे ठेवण्याऐवजी सैल वेणी बांधा आणि झोपा.
सुती कापडाचे उशीचे कव्हर वापरण्याऐवजी सिल्क किंवा सॅटिनचे कव्हर वापरा.
तुम्ही तुमचे केस बांधून राहावे व गळू नये यासाठी केसांना कव्हर करण्यासाठी सिल्क कॅप देखील खरेदी करू शकता, झोपताना ती कॅप घातल्याने तुमच्या केसांना नुकसान होत नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
