AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाल हिरवा आणि पिवळा ‘हे’ तीन रंगांचे कूलिंग फेसपॅक उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला बनवतील चमकदार

उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्यासाठी, ताजेपणा आणण्यासाठी आणि निस्तेजपणा कमी करण्यासाठी नैसर्गिक घटक खूप प्रभावी ठरतात. महागड्या केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादनांऐवजी तुमच्या उन्हाळ्यातील स्किन केअरच्या रूटिंगमध्ये या तीन वेगवेगळ्या फेस पॅकचा समावेश करा. चला तर मग या घरगूती पद्धतीने तयार केलेल्या फेसपॅकचे फायदे जाणून घेऊयात.

लाल हिरवा आणि पिवळा 'हे' तीन रंगांचे कूलिंग फेसपॅक उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला बनवतील चमकदार
लाल हिरवा आणि पिवळा 'हे' तीन रंगांचे कूलिंग फेसपॅक उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला बनवतील चमकदारImage Credit source: Money 9 वरून
| Edited By: | Updated on: Mar 31, 2026 | 4:10 PM
Share

उन्हाळा सुरू झाला की या दिवसांमध्ये उष्ण तापमान, प्रदूषण आणि घाम यामुळे या ऋतूत बहुतेक लोकांना मुरुमे, तेलकट त्वचा, त्वचेचा काळपटपणा आणि निस्तेजपणा यांसारख्या समस्या जाणवतात. या समस्या कमी करण्यासाठी कोणत्याही महागड्या स्किन केअर प्रोडक्टचा वापर करण्याऐवजी तुम्ही काही नैसर्गिक घटकांचा वापर करून या उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची चमक तर वाढवू शकताच, पण या त्वचेच्या समस्यांपासूनही सुटका मिळवू शकता. कारण निसर्गात वेगवेगळ्या रंगांचे अनेक घटक आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे चांगले परिणाम आहेत. या लेखात आपण लाल, हिरवा आणि पिवळा या तीन वेगवेगळ्या रंगांच्या फेस पॅकबद्दल जाणून घेणार आहोत, जे उन्हाळ्यात तुमचा चेहरा चमकदार ठेवतील आणि मुरुमे व तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासही मदत करतील.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना होणारी सर्वात सामान्य चूक म्हणजे त्वचेला पुरेसा ओलावा न मिळणे. लोकं अनेकदा मॉइश्चरायझर लावायला विसरतात. यामुळे त्वचा कोरडी होऊन निस्तेज दिसू शकते. म्हणून हलक्या वजनाचे मॉइश्चरायझर वापरा. ​​याव्यतिरिक्त, काही नैसर्गिक फेस पॅक त्वचेला ओलावा देण्यास, त्वचा स्वच्छ करण्यास आणि चमक देण्यास मदत करू शकतात. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया.

लाल रंगांचा फेस पॅक

उन्हाळ्यात तुम्हाला जर उन्हामुळे त्वचेवर पुरळ, लालसरपणा आणि हलकी सूज येत असेल तर तुमच्या त्वचेला थंडावा व ओलावा देण्याची गरज आहे. यासाठी लाल चंदनाचा फेस पॅक उत्तम आहे. एक चमचा लाल चंदनाची पावडर, थोडे मध आणि गुलाबपाणी एकत्र करून फेस पॅक तयार करा. हा लाल रंगांचा फेसपॅक त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावरील मुरुमे आणि उन्हाळ्यातील पुरळांपासूनही आराम मिळतो.

हिरव्या रंगाचा फेस पॅक

उन्हाळ्याच्या दिवसात तुमची त्वचा चमकदार फ्रेश तसेच त्वचेला आर्द्रता हवी असेल तर हा हिरव्या रंगाचा फेस पॅक वापरून पहा. यामुळे त्वचेवरील डाग कमी होतील, त्वचेची छिद्रे घट्ट होतील आणि अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होईल. कडुलिंबाच्या वापरामुळे हा फेस पॅक तुम्हाला त्वचेच्या ॲलर्जीपासूनही दूर ठेवेल. हा फेस पॅक बनवण्यासाठी एक काकडी किसून तिचा रस काढा. आता या काकडीच्या रसात कोरफडीचा गर, पुदिन्याच्या पानांची पेस्ट, कडुलिंबाच्या पानांची पेस्ट, थोडे दही आणि बेसन मिक्स करून हा फेसपॅक त्वचेवर लावा.

पिवळा फेस पॅक

उन्हाळ्यात तुमची त्वचा तरुण आणि फ्रेश दिसण्यासाठी टॅनिंग दूर करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील मुरुमे कमी करण्यासाठी, पिवळ्या रंगाचा फेस पॅक बनवा. यासाठी तुम्हाला दही, हळद, बेसन आणि संत्र्याच्या सालीची पावडर हे सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट बनवा. गरज वाटल्यास गुलाबपाणी यात मिक्स करा आणि जर टॅनिंग जास्त असेल तर लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. (तुमची त्वचा संवेदनशील असल्यास लिंबू वापरणे टाळा.) हा फेसपॅक लावून 15-20 मिनिट ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

हे तीन रंगांचे फेस पॅक कसे लावावे?

तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार तुम्ही हे फेस पॅक तुमच्या उन्हाळ्यातील स्किनकेअर रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता. हे फेस पॅक आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा लावा. ​​नैसर्गिक घटकांनी बनवलेले हे फेसपॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. लावल्यानंतर 80 टक्के सुकल्यावर हाताने चेहऱ्यावर गुलाबजल लावा आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा साध्या पाण्याने धुवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने