AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या झाडांची पानं म्हणजे सापांपासून बचावाचं सुरक्षाकवचच, भुकटी तयार करून घराच्या या भागात ठेवा, साप पुन्हा कधीच दिसणार नाही

पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप अनेकदा कोरड्या आणि सुरक्षित जागेच्या शोधात आपल्या घरात घुसतात. यामुळे सर्पदंशाचा धोका वाढतो. मात्र अशा काही वनस्पती असतात, ज्यामुळे तुमचा सापांपासून बचाव होऊ शकतो.

या झाडांची पानं म्हणजे सापांपासून बचावाचं सुरक्षाकवचच, भुकटी तयार करून घराच्या या भागात ठेवा, साप पुन्हा कधीच दिसणार नाही
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 09, 2026 | 8:59 PM
Share

पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्याच्या काळात सापांच्या बिळात पाणी घुसल्यामुळे ते जमिनीवर येतात. अनेकदा तर पावसाच्या पाण्यात देखील साप तरंगताना दिसतात. त्यामुळे पावसाळ्यात योग्य ती खबरदारी घ्यावी, अन्यथा सर्पदंश होऊ शकतो. पावसाच्या पाण्यात चालताना आपलं लक्ष नेहमी आजूबाजुला असावं. पावसाळ्यामध्ये तुम्ही अनेकदा अनुभव घेतला असेल की तुमच्या कॉलनीमध्ये परिसरात किंवा घरात वारंवार साप निघण्याच्या घटना घडतात? हे असं का होतं तर त्याचं मुख्य कारण म्हणजे साप बिळात पाणी घुसल्यामुळे नेहमी कोरड्या आणि सुरक्षित जागेचा शोध घेत असतात, त्यामुळे ते तुमच्या कॉलनीमध्ये बिल्डिगमध्ये अगदी तुमच्या घरात देखील घुसू शकतात. जर तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी देखील सर्पदंशाचा धोका वाढतो.

महाराष्ट्रात जे विषारी साप आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने चार प्रजातींचा समावेश होतो. यामध्ये घोणस, फुरसे मण्यार आणि नाग या प्रमुख विषारी जाती आहे. सर्वात जास्त धोका हा घोणस आणि मण्यार प्रजातीच्या सापांपासून होतो. कारण घोणस सापांची संख्या अलिकडच्या काळात प्रचंड प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे हे साप आपल्याला कुठेही रस्त्याने दिसून येतात. परंतु हे खूप विषारी साप असतात. अनेकजण तर आजगर समजून या सापाला पकडायला जातात. परंतु अशी चूक करता कामा नये, जर तुमच्या घरात किंवा कॉलनीमध्ये कुठेही साप आढळला तर त्याची माहिती सर्वात आधी सर्पमित्रांना द्यावी.

सापांपासून बचाव कसा करायचा यासाठी अनेक उपाय आहेत, काही वनस्पतींमध्ये निसर्गताच असे गुणधर्म असतात, की त्या वनस्पतीपासून साप दूर रहातात. त्या वनस्पतीच्या आसपास देखील साप येत नाहीत. त्यापैकीच एक अफुमारी नावाची वनस्पती आहे. अफुमारी ही वनस्पती आयुर्वेदिक वनस्पती आहे, आयुर्वेदामध्ये तिचे अनेक उपयोग सांगण्यात आले आहेत. परंतु हीच वनस्पती तुमचा सापांपासून बचाव देखील करू शकते. या वनस्पतीच्या पानांना विशिष्ट प्रकारचा वास असतो, त्यामुळे साप तुमच्या घराच्या आसपास देखील येत नाही. या नवस्पतीचे पानं सावलीमध्ये वाळवायचे? त्यानंतर या पानाची पावडर करायची आणि तुम्हाला असं वाटंत जिथून साप तुमच्या घरात प्रवेश करू शकतो, त्या -त्या ठिकाणी या पावडरची एक -एक पुडी ठेवायची. या पानाच्या वासामुळे साप शक्यतो घरात येत नाहीत.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक