AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : कुटुंबप्रमुखाने ही तीन काम केलीच पाहिजेत, अन्यथा आयुष्यात येते पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी कुटुंबप्रमुखाची काय कर्तव्य असतात? काय जबाबदारी असते? तसेच त्याने काय केलं पाहिजे? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : कुटुंबप्रमुखाने ही तीन काम केलीच पाहिजेत, अन्यथा आयुष्यात येते पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
CHANAKYA Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 09, 2026 | 8:18 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये कुटुंबप्रमुखाला मोलाचा सल्ला दिला आहे. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये कुटुंबप्रमुखाची कर्तव्ये काय असतात? जबाबदाऱ्या काय असतात? तसेच कुटुंब प्रमुखाने आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात घरातील कुटुंब प्रमुख हा त्या घराचा मुख्य आधार असतो. तुम्ही कधी फुलांची माळ पाहिली आहे का? ज्या प्रमाणे एक धागा सर्व फुलांना एकत्र करतो, तीच भूमिका घरात कुटुंबप्रमुखाची असते. तो धागाच जर निसटला तर ती फुलं कधीही एकत्र येऊ शकत नाही. त्यामुळे घरात कुटुंबप्रमुखाची भूमिका ही सर्वात महत्त्वाची असते. कुटंबप्रमुख हा त्या घराचा आधार असतो, भिंत असतो. कुटुंबाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी कुटुंबप्रमुखाची काही कर्तव्य देखील सांगितली आहेत.

मुलांचं शिक्षण – चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही झालं तरी चालेल परंतु घरातील मुलं ही अशिक्षित राहता कामा नये, कारण मुलं ही कोणत्याही कुटुंबाचा आणि कुटुंबातील वृद्ध व्यक्तींचा आधार असतात, तुम्ही जर मुलांना चांगलं शिक्षण दिलं नाही, तर त्यांना रोजगार मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ते तुमचा चांगला सांभाळ करण्यास असमर्थ ठरतील, तुमच्यावर भविष्यात पश्चातापाची वेळ येऊ शकते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संस्कार – चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही होऊ द्या, परंतु आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यास कधीही विसरू नका, मुलं जेव्हा लहान असतात, तेव्हा काय चांगलं? काय वाईट यांची ओळख त्यांन नसते. जर या वयात त्यांच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत, तर भविष्यात त्यांना वाईट वळण लागू शकतं. त्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून किंवा आई-वडील म्हणून मुलांवर चांगले संस्कार घडवण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

बचत – चाणक्य म्हणतात या जगात पैशांशिवाय कोणतंही काम होत नाही, जर तुमच्याकडे पैसा असेल तर कोणतंही संकट तुमच्यावर येऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही शंभर रुपये कमवत असाल तर त्यातील 25 रुपयांची बचत करा आणि हे पैसे आपल्या पुढच्या पिढीसाठी जपून ठेवा, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
‘देवा’च्या इच्छेने मी मंत्रिमंडळातून बाहेर, भाजपाच्या बड्या नेत्याने वात पेटवली; म्हणाले… तर जनता नेत्यांवर विश्वास ठेवणार नाही.

‘देवा’च्या इच्छेने मी मंत्रिमंडळातून बाहेर, भाजपाच्या बड्या नेत्याने वात पेटवली; म्हणाले… तर जनता नेत्यांवर विश्वास ठेवणार नाही

IMD Rain Update : 21 जुलैची तारीख लिहून ठेवाच! धो धो पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार, नदी-नाले तुडूंब भरणार!.

IMD Rain Update : 21 जुलैची तारीख लिहून ठेवाच! धो धो पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार, नदी-नाले तुडूंब भरणार!

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंद होईल, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली इच्छा.

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंद होईल, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली इच्छा

बागेश्वर बाबाच्या भावाचा मोठा कांड, पोलिसांनी तडकाफडकी बेड्या ठोकल्या; मोठी खळबळ.

बागेश्वर बाबाच्या भावाचा मोठा कांड, पोलिसांनी तडकाफडकी बेड्या ठोकल्या; मोठी खळबळ

दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी केली जाणार, शासनादेश जारी.

दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी केली जाणार, शासनादेश जारी

अखेर अमित शाहांनी शब्द दिला, एकनाथ शिंदेंनी भेट घेताच…दिल्लीच्या बैठकीत मिळालं मोठं आश्वासन!.

अखेर अमित शाहांनी शब्द दिला, एकनाथ शिंदेंनी भेट घेताच…दिल्लीच्या बैठकीत मिळालं मोठं आश्वासन!