बेडरूममध्ये कधीही ठेवू नयेत ‘या’ तीन गोष्टी, शारीरिक-मानसिक आरोग्यावर होईल वाईट परिणाम
आपल्या घरातील सर्वात महत्वाची खोली म्हणजे बेडरूम. पण अशा काही गोष्टी असतात ज्या बेडरूमध्ये ठेवल्याने तुमच्या आरोग्याला नुकसान पोहचू शकते. चला तर मग तज्ञांनी कोणत्या गोष्टी बेडरूममध्ये ठेऊ नये याबद्दल सांगितले आहे ते आजच्या लेखात जाणून घेऊयात...

बेडरूम आपल्या घरातील सर्वात महत्वाची खोली आहे. जिथे आपण दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आराम करत असतो. तसेच आरामदायी झोप व सकारात्मक वातावरण रूममध्ये राहावे यासाठी अनेकजण वेगवेगळ्या वस्तू ठेवतात. जसे की आरामदायी गादी, मऊ उशी, रूम फ्रेशनर, तसेच रूम मध्ये सजावटीचे सामान. पण तुम्हाला माहिती आहे का की बेडरूममध्ये ठेवलेल्या काही वस्तू तुमचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य बिघडण्यास कारणभूत ठरतात. तर तुम्हाला हे ऐकायला थोडे वेगळे वाटेल असेल पण ते खरे आहे. यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या बेडरूम मधून कोणत्या तीन वस्तू ठेवणे टाळे पाहिजे ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथून प्रशिक्षण घेतलेले डॉ. सौरभ सेठी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी सांगितले आहे की बेडरूममध्ये कधीही या तीन गोष्टी ठेवू नयेत, तर या व्हिडिओच्या 0कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे- “तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या बेडरूम मधील या वस्तू तुमच्या पोटावर, झोपेवर आणि दीर्घकालीन आरोग्यावर शांतपणे परिणाम करत आहे?” व्हिडिओमध्ये सेठी यांनी त्या 3 गोष्टींबद्दल देखील सांगितले आहे, ज्यामध्ये रूम एअर फ्रेशनर, जुनी उशी आणि जुनी गादी यांचा समावेश आहे.
जुनी उशी ताबडतोब बदला
तज्ञांच्या मते, जुनी उशी ताबडतोब बदलावी. कारण कालांतराने उशीवर धूळ कण, घाम आणि ॲलर्जी निर्माण करणारे घटक जमा होतात, ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे व मुरूम येणे अशा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जर तुमची उशी 1-2 वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल, तर ती लगेच बदला आणि नवीन उशी घ्या.
View this post on Instagram
सिंथेटिक एअर फ्रेशनर्स देखील आहेत हानिकारक
बेडरूम मधील वातावरण फ्रेश राहण्यासाठी अनेकजण रूम एअर फ्रेशनर्सचा वापर करतात. यातील सिंथेटिक एअर फ्रेशनर्समध्ये phthalates आणि वाष्पशील सेंद्रिय संयुगे (VOCs) सोडले जातात ज्यामुळे श्वसन समस्या उद्भवू शकतात. एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की 86 टक्के एअर फ्रेशनर्समध्ये phthalates असतात, जे दम्याशी संबंधित केमिकल असतात जे शरीरावर व आरोग्यावर परिणाम करतात. अशावेळेस बेडरूममध्ये सिंथेटिक एअर फ्रेशनर्स वापरण्याऐवजी सेंद्रिय सुगंध वापरा.
जीर्ण झालेली गादी देखील आरोग्यावर करतात परिणाम
डॉ. सेठी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे की 7 ते 10 वर्षांपेक्षा जुन्या गादीवर झोपु नये. ज्यामुळे पाठदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जर तुमची गादी इतकी जुनी झाली असेल तर ती ताबडतोब बदला.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
