ट्रांसजेंडर भूक भागवण्यासाठी सेक्स वर्कसाठी गेले, पण दुसऱ्या दिवशी…, कोणी केली हैराण करणारा खुलासा
Transgender Life: एक - दोन रुपयांसाठी लोकांनी... भूक भागवण्यासाठी सेक्स वर्कसाठी गेलेल्या ट्रांसजेंडरसोबत असं झालं तरी काय, दुसऱ्या दिवशी त्या घरी परतल्याच नाहीत.... कोणी केली हैराण करणारा खुलासा

Transgender Life: जेन्टलमेन गागा ही एक ट्रांसजेंडर असून एक अँकर, स्टालिस्ट, मेकअर आर्टिस्ट आहे.. मराठी कुटुंबात जन्म झालेल्या गागा हिचं नाव संकेत सावंत असं आहे. पण गागा नावाने ती प्रसिद्ध लोकप्रिय आहे. नुकताच झालेल्या एका मुलखतीत गागा हिने ट्रांसजेंडरच्या खडतर प्रवासाबद्दल मोठा खुलासा केला आहे. गागा हिच्या अनेक मैत्रिणी अशा देखील आहेत ज्या सेक्स वर्कसाठी गेल्या पण दुसऱ्या दिवशी घरी परतल्याच नाही… गागाने त्यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
जेन्टलमेन गागा म्हणाली, ‘ट्रांसजेंडरचा प्रवास कधीच सोपा नसतो. माझे असे अनेक समलैंगिक फ्रेंड्स आहेत. ज्यांना त्यांच्या आई – वडिलांना स्वीकारलं नाही. ज्या गोष्टी त्यांना मिळायला हव्यात त्या देखील त्यांना मिळाल्या नाहीत. दोन वेळचं जेवण किंवा डोक्याखाली एक छत असणं देखील सुद्धा माझ्या फ्रेंड्सना मिळालेलं नाही. माझ्यापेक्षा देखील अत्यंत वाईट परिस्थिती लोकं जगत आहेत. त्यामुळे मला असं बिलकूल सांगायचं नाही की, मी असंख्य वेदना सहन केल्या आहेत. असं नाही की मी वाईट दिवस पाहिले नाहीत. पण माझ्यापेक्षा देखील कठीण दिवस माझ्या समाजातील लोकांनी काढले आहेत.’
View this post on Instagram
‘एक – दोन रुपयांसाठी लोकांनी खूप काही केलं आहे. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत ज्यांना आई-वडिलांनी ट्रांसजेंडर म्हणून स्वीकारलं नाही. त्यांना रस्त्यावर झोपावं लागलं. त्यांच्या खायचे देखील वांदे होते. कोणी त्यांना काम देण्यासाठी तयार नव्हतं. यूपी, बिहार मधील लहान लहान गावांमधून ते मुंबईत पळून आले. पैसे कमावण्यासाठी दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे त्यांना सेक्स वर्क करावा लागला. अनेक जण गंभीर आजाराच्या विळख्यात सापडले. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत ज्यांची हत्या झाली आहे. ज्या सेक्स वर्क करण्यासाठी गेल्या, त्यांच्या ग्राहकांना भेटल्या पण दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतल्याच नाहीत.. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांचा मृतदेह सापडला नाही. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. ट्रांसजेंडरच्या हक्कासाठी कायद्यामध्ये अनेक बदल झाले आहेत पण तही देखील आम्ही वाईट प्रसंगाचा सामना करतच आहोत…’ असं देखील गागा म्हणाली.
जसे तुम्ही आहात तसेच आम्ही – गागा
गागा म्हणाली, ‘गोष्टी स्वीकारायला शिका. आमच्याबद्दल तुम्ही जे काही विचार करताय ते विचार आधी बदला. जसे तुम्ही आहात तसेच आम्ही देखील आहोत. आम्ही कोणी एलियन नाही. आमचा जन्म देखील आईच्या पोटातून झाला आहे. आम्हाला काम देऊन तर बघा.. आम्ही सुद्धा प्रत्येक क्षेत्रात काम करण्यासाठी तयार आहोत…’ असं देखील गागा म्हणाली. जेन्टलमेन गागा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
