Coloured Hair Care: कलर केलेल्या केसांची काळजी घेताना या 4 गोष्टींकडे द्या विशेष लक्ष

हेअर कलर केल्यानंतर त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे कलर केलेल्या केसांची काळजी घेणे सोपे होईल.

Coloured Hair Care: कलर केलेल्या केसांची काळजी घेताना या 4 गोष्टींकडे द्या विशेष लक्ष
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 11:06 AM

नवी दिल्ली – आजकाल केस विविध रंगात रंगवणे (hair colour) म्हणजेच त्यांना कलर करणे हे खूप कॉमन झाले आहे. काही जण केवळ एखादी बट रंगवतात तर काही जण हायलाइट्स करतात तर काही लोकांना मात्र संपूर्ण केसांचा रंगच बदलायला आवडतो. पण ते केस कलर केल्यानंतर त्यांची काळजी (hair care) घेताना बरेच जण काही चुका करताना दिसतात. रंगवलेल्या केसांची नीट काळजी घेतली नाही तर रंग तर लवकर निघून जातोच पण आपल्या केसांचेही नुकसान (hair damage) होते. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्याच्या सहाय्याने तुम्ही कलर केलेल्या केसांची नीट काळजी घेऊ शकाल व त्यामुळे तुमच्या केसांचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल.

हेअर कलरवर संशोधन

2010 साली हेअर कलरबद्दल करण्यात आलेले संशोधन एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार कलर करण्यात आलेले केस रोज शांपूने धुतल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते. केस कलर केल्यानंतर काही काळाने कलर फेड होणे किंवा हळूहळू की होणे हे स्वाभाविक आहे, पण शांपूचा वापर केल्यास कलर लवकर गायब होऊ शकतो. रिपोर्टनुसार, हे कलर पाण्यात विरघळणारे असतात.

हे सुद्धा वाचा

अशी घ्या रंगवलेल्या केसांची काळजी

इतके दिवस धुवू नका केस

एका रिपोर्टनुसार, केसांना कलर केल्यानंतर सुमारे 3 दिवस ते धुवू नयेत. कलर केलेल्या केसांमध्ये क्यूटिकल ओपन होतात आणि जर केस धुतले तर त्यातील कलर निघून जातो. त्यामुळे केस रंगवल्यावर काही दिवस शांपूने धुवू नयेत. तसेच कोणताही शांपू वापरू नये, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कलर केलेल्या केसांसाठी मिळतो तोच शांपू वापरावा. त्यामुळे केसांचा कलर जास्त दिवस टिकतो.

कंडीशनरचा वापर करा

केसांचे चांगले पोषण व्हावे यासाठी त्यांना मॉयश्चराइज करणे आवश्यक असते. त्यामुळे केवळ कलर केलेल्या केसांनाच नव्हे तर साथध्या केसांनाही कंडिशनर नियमितपणे लावावे. केसांमधील ओलावा टिकवून ठेवल्याने ते जास्त काळ हायड्रेटेड राहतात.

पाण्याचे तापमान

तज्ज्ञांच्या मते, केस धुताना पाणी खूप गरम असेल तर त्यामुळे केसांचे क्युटिकल्स उघडतात आणि त्यावर लावलेला रंग फिका पडू लागतो. त्यामुळे केस धुताना साधे किंवा कोमट पाणी वापरावे. थंडीतही कलर केलेले केस साध्या पाण्याने धुवावेत. खूप थंडी असेल तर तुम्ही केस धुण्यासाठी दुपारची वेळ निवडू शकता.

ऊन्हापासून करा संरक्षण

कलर केलेल्या केसांचे नेहमी सूर्यप्रकाश किंवा यूव्ही किरणांपासून संरक्षण केले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, जर ते सूर्यप्रकाशाच्या अती संपर्कात आले तर केसांचा रंग झपाट्याने फिका पडू लागतो.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.