AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shopping : बाजारातून या 8 वस्तू कधीच खरेदी करु नका, प्रत्येक महिन्यात होईल जबरदस्त बचत

Things To Stop Buying From Market : खरेदी करण्याची आवड प्रत्येकाला असते. पण आपण अशा काही वस्तू खरेदी करतो, ज्या फार काही गरजेच्या नसतात. याच गोष्टीमुळे अधिकचा पैसा खर्च होतो. त्यामुळे जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या खरेदी करणं टाळलं पाहिजे.

Shopping : बाजारातून या 8 वस्तू कधीच खरेदी करु नका, प्रत्येक महिन्यात होईल जबरदस्त बचत
| Updated on: Sep 04, 2026 | 12:17 PM
Share

सण सुरु झाले आहे. गणपती नंतर नवरात्री आणि दिवळी मोठ्या थाटात साजरी होणार आहे. पण खरेदी करताना आपण काही गोष्टी खरेदी करतो. ज्या खरंच आपल्यासाठी फार गरजेच्या नसतात. आजकाल बहुतेक लोक आपल्या खरेदीच्या यादीत अशा गोष्टींचा समावेश करतात ज्यांची त्यांना प्रत्यक्षात गरज नसते. सवय, सोय किंवा विविध ऑफर्सचे आकर्षण यामुळे आपण वारंवार अशा वस्तू खरेदी करतो, जी एकदा वापरल्यानंतर कचऱ्यात टाकली जातात. ती खरेदी करून आपण पैशांचा अपव्यय करत आहोत हे माहीत असूनही, अनेकदा सवयीमुळे आपण अशा वस्तूंची खरेदी करतो. तर जाणून घ्या कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या, खरेदी करणं टाळणं पाहिजे.

1. प्लास्टिकच्या पिशव्या (Single-use plastic storage bags): या यादीत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या अव्वल स्थानी आहेत. दरवेळी प्लास्टिकच्या नवीन ‘झिप-लॉक’ पिशव्या विकत घेण्याऐवजी, तुम्ही पुन्हा वापरता येण्याजोग्या सिलिकॉन पिशव्या किंवा काचेची भांडी वापरू शकता. त्या टिकाऊ असतात आणि त्यांचा वारंवार वापर करता येतो.

2. प्लास्टिक रॅप : अन्न झाकण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक रॅप लवकर संपते आणि त्यामुळे कचरा वाढतो. त्याऐवजी सिलिकॉन कव्हर्स किंवा झाकणं वापरणं हा एक उत्तम पर्याय आहे.

3. स्प्रे किंवा साफसफाईची बाटली: कपड्यांवरील धूळ किंवा केस काढण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन स्प्रे बाटली विकत घेणं म्हणजे पैशांचा अपव्यय आहे आणि तसं करण्याची गरजही नाही. त्याऐवजी, एकदाच एक मजबूत बाटली विकत घ्या आणि ती पुन्हा पुन्हा भरून वापरा. ​​यामुळे पैसे आणि प्लास्टिक, या दोन्ही गोष्टींची बचत होते.

4. डिस्पोजेबल लिंट रोलर: कपड्यांवरील धूळ किंवा केस काढण्यासाठी वारंवार नवीन रोलर्स विकत घेण्यापेक्षा, पुन्हा वापरता येण्याजोगा लिंट रिमूव्हर वापरणं हा अधिक चांगला पर्याय आहे.

5. पेपर टॉवेल्स: आजकल दैनंदिन साफसफाईसाठी लोक पेपर टॉवेल्सचा वापर करतात. मात्र, हे पेपर टॉवेल्स लवकर संपतात आणि ते वारंवार विकत घेतल्यानं पैशांचा अपव्यय होतो. जर तुम्हाला पैशांची नासाडी टाळायची असेल, तर त्याऐवजी धुता येण्याजोग्या कापडांचा वापर सुरू करा; ती अधिक किफायतशीर आणि टिकाऊ असतात.

6. स्वस्त प्लास्टिकचे डबे: प्लास्टिकच्या डब्यांवर सहज डाग पडतात आणि ते लवकर फुटतात. शिवाय, त्यामध्ये अन्न साठवणे आरोग्यासाठी सुरक्षित नसतं. त्याऐवजी काचेचे किंवा स्टीलचे डबे वापरा; ते अधिक मजबूत आणि टिकाऊ असतात.

7. डिटर्जंटच्या बाटल्या: मोठ्या प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी तुम्ही डिटर्जंट शीट्स किंवा रिफिल पॅक्स वापरू शकता. हे वजनाला हलकं असतात आणि कमी जागा व्यापतात.

8. मेकअप वाइप्स: या यादीतील शेवटची वस्तू म्हणजे मेकअप वाइप्स. एकदा वापरल्यानंतर त्या फेकून दिल्या जात असल्याने, त्यांना पैशांचा अपव्यय मानणं चुकीचं ठरणार नाही. त्याऐवजी पुन्हा वापरता येण्याजोगे कॉटन पॅड्स किंवा कापड हे अधिक चांगले पर्याय आहेत.

Follow Us
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर