हे पेय हिवाळ्यासाठी आहे एक सुपर टॉनिक, रामदेव बाबांनी सांगितला थंडीपासून बचावाचा रामबाण उपाय
कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी रामदेव बाब यांनी एक ड्रिंक सांगितलं आहे, यामुळे वातावरणात अचानक बदल झाला तर त्यापासून तुमच्या शरीराचं संरक्षण होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

थंडीमध्ये शरीराला गरम ठेवणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप गरजेचं असतं. थंडीच्या दिवसांमध्ये गार वारा आणि झपाट्यानं कमी होणाऱ्या तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप या सारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये डायटकडं विशेष लक्ष द्यावं लागतं, डायटमध्ये थोडीजरी चूक झाली तरी तुमचं आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. अशा स्थितीमध्ये आपण अनेकदा आयुर्वेद तज्ज्ञांचा देखील सल्ला घेतो, त्यांनी सुचवलेले ड्रिंक्स आणि फळांचं सेवन या काळात आपण करतो. आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत, जे आतून तुमच्या शरीराला गरम ठेवतात, आणि हिवाळ्यात निर्माण होणाऱ्या विविध आरोग्याच्या समस्यांपासून तुमचा बचाव करतात. योगगुरू रामदेव बाबा यांनी देखील असेच काही उपाय सुचवले आहेत, त्याबद्दल आज आपण त्याची माहिती जाणून घेणार आहोत. नुकतच त्यांनी थंडीच्या दिवसामध्ये पिण्यासाठी असं एक ड्रिंक सांगितलं आहे, ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये देखील करू शकता. त्यामुळे तापमानात कितीही बदल झाला तरी त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही, आणि तुमचं थंडीपासून संरक्षण होईल.
रामदेव बाबा यांचं सूपर टॉनिक ड्रिंक
रामदेव बाबा नियमितपणे आपल्या इंन्स्टाग्रामवर आयुर्वेदिक उपायांबाबतचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. असाच त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी कडाक्याच्या थंडीपासून बचावाचा उपाय सांगताना एका ड्रिंकबद्दल माहिती दिली आहे. रामदेव बाबा म्हणतात की हे ड्रिंक कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी रामबाण उपाय आहे, जे थंडीपासून होणाऱ्या विविध आजारांपासून तुमच्या शरीराचं रक्षण करेल आणि तुमचं शरीर आतून गरम ठेवेल. त्यांनी हे ड्रिक कसं तयार करायचं याची माहिती देखील दिली आहे. चला तर मग जाणून घेऊयात रामदेव बाबा यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.
View this post on Instagram
रामदेव बाबा म्हणतात हे ड्रिंक बनवण्यासाठी एक मोठा ग्लास दूध घ्या, दूध हे कॅल्शियमचा सर्वात मोठा स्त्रोत आहे, दुधामुळे आपली हाडे मजबूत होतात. दुधामध्ये आदरक किसून घाला. त्यानंतर या दुधामध्ये थोडी हळद, पतंजलीचं केसर, एक -दोन थेंब शिलाजीत आणि मध टाकून हे मिश्रण चांगलं ढवळून घ्या, हे मिश्रण हलवल्यानंतर याला कॉफी सारखा रंग प्राप्त होईल, त्यानंतर त्याच्यामध्ये वरून थोडी दालचीनीची पावडर टाका, हे ड्रिंक तुम्ही दररोज पिऊ शकता, यामुळे तुमचं थंडीपासून संरक्षण होईल. ज्यांना दूध आवडत नाही ते देखील हे ड्रिंक तयार करू शकता, फक्त त्यासाठी काचेचा एक मोठा ग्लास घ्या, त्यामध्ये दूर वगळता वर सांगितलेल्या सर्व गोष्टी टाका आणि त्याचं सेवन करा असा सल्ला रामदेव बाबा यांनी दिला आहे.
