जेवताना ही एक चूक करताय? पैसे आणि आरोग्य दोन्ही जाईल हातातून
वास्तुशास्त्रात जेवणासाठी कोणती दिशा शुभ तसेच कुठे बसून जेवण करणे टाळावे हे देखील सांगितले आहे. चला आजच्या लेखात आपण हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रात आनंदी जीवनासाठी अनेक नियम सांगितले आहेत. घर उभारण्यापासून ते घरात कोणत्या दिशेला वस्तु ठेवाव्यात हे आपणप्रत्येकजण वास्तुशास्त्रानुसार करत असतो. कारण वास्तुनुसार घरातील अशा काही गोष्टी असतात ज्याचा परिणाम किंवा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. त्यातच अन्नाशी संबंधित नियम देखील सांगितले आहेत. वास्तुशास्त्रात जेवण्यासाठी कोणती दिशा शुभ आहे हे स्पष्ट सांगितले आहे. तसेच वास्तुशास्त्रात कुठे बसुन जेवावे हे देखील सांगितले आहे. असे मानले जाते की जे वास्तु तत्वांचे पालन करत नाहीत त्यांना जीवनात अनेक अडचणी येतात. यामुळे अशुभ परिणाम होतात. म्हणून, जेवणापूर्वी किंवा जेवणादरम्यान वास्तुशास्त्राच्या नियमांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जेवणादरम्यान कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात.
या ठिकाणी बसून जेवण करू नका
वास्तुशास्त्रानुसार, कधीही दाराशी बसून जेवू नये. असे मानले जाते की जो व्यक्ती दाराशी बसून जेवतो त्याच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. धार्मिक मान्यतेनुसार देव-देवता दाराशी राहतात. म्हणून, या ठिकाणी जेवण करणे टाळा.
ही दिशा जेवण्यासाठी शुभ आहे
वास्तुशास्त्र तुमच्या जेवणाच्या दिशेकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देते. वास्तुशास्त्रानुसार जेवताना पूर्वेकडे तोंड करून जेवावे. या दिशेला जेवल्याने घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.
ही चूक चुकूनही करू नये
अन्न हे परब्रम्ह आहे हे आपल्या सर्वांना महित आहे, म्हणून तुम्ही जेवण करत असलेलं ताट व इतर भांडी तुटलेली नाहीत ना याची काळजी घेतली पाहिजे. कारण वास्तुनुसार तुटलेल्या भांड्यात जेवण बनवण्याची तसेच जेवणाची शिफारस केलेली नाही. खराब झालेल्या ताटात जेवल्यास व भांड्यात जेवण बनवल्यास अन्नाचा अपमान होतो. असे करणाऱ्यांना आयुष्यात दुर्दैव आणि अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते.
बेडवर बसून जेवू नये
जर तुम्ही बेडवर बसून आरामात जेवत असाल तर हे करणे ताबडतोब थांबवा. कारण यामुळे तुमच्या आरोग्याची स्थिती बदलू शकते आणि आर्थिक स्थितीही बिघडु शकते. तर बेडवर बसून जेवल्याने घरात पैशाचे नुकसान होते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
