AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या घरातील हा पदार्थ करेल मधुमेह व उच्च रक्तदाबाची समस्या दूर

रक्तातील साखर नियंत्रीत करण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जात असतो. यासाठी अनेक महागडे उपचार घ्यावे लागतात. परंतु तुम्ही घरगुती पध्दतीने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रीत करु शकतात. तुमच्या घरातील एक पदार्थ त्यावर उत्तम काम करु शकतो.

तुमच्या घरातील हा पदार्थ करेल मधुमेह व उच्च रक्तदाबाची समस्या दूर
खरीप आणि उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक वाढल्याने दर घसरत आहेत.
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 9:38 AM
Share

बदलत्या जीवनपध्दतींमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो. यात, मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (High blood pressure), ह्रदयरोग आदी आजारांचा प्रामुख्याने समावेश होत असतो. जगाच्या तुलनेत भारतात तर, मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढत आहे. लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, फास्टफूड आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणाबाहेर (Out of control) गेल्यास मधुमेहाचा धोका वाढू शकतो. वारंवार तहान लागणे, थकवा येणे आणि वारंवार लघवी होणे ही मधुमेहाची मुख्य लक्षणे आहेत. जेव्हा मधुमेहाची समस्या निर्माण होते, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. अशा परिस्थितीत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

आपल्या शरीराला अन्नातून ग्लुकोज मिळत असते. या ग्लुकोजचा वापर पेशी शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी करीत असतात. शरीरात इन्सुलिनची कमतरता असल्यास पेशी आपले काम नीट करु शकत नाही. परिणामी पेशींना ग्लुकोज मिळत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहणे अत्यंत महत्वाचे असते. अब्राका येथील डेल्टा स्टेट युनिव्हर्सिटीचे मुख्य अन्वेषक अँथनी ओजिह यांनी सांगितले की, कांदे अतिशय स्वस्त आणि सहज मिळणारी गोष्ट आहे. कांद्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात, ज्याचा उपयोग मधुमेहाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. प्राण्यांच्या अभ्यासात कांद्याच्या रसाच्या वेगवेगळ्या डोसचे परिणाम उंदरांच्या तीन वेगवेगळ्या गटांवर दिसून आले. यामध्ये उंदरांना दररोज 400 आणि 600 mg/kg कांद्याचा रस देण्यात आला. ते खाल्ल्यानंतर उंदरांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासली असता रक्तातील साखरेची पातळी 50 ते 35 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले.

ओजिह यांनी सांगितले, की कांदे रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतील अशा यंत्रणेची तपासणी केली परंतु त्याबद्दल अद्याप कोणताही पुरावा नाही. क्वेरसेटिन आणि सल्फर रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. या दोन्हीमध्ये मधुमेह कमी करण्याची क्षमता आहे. क्वेरसेटिन, जे एक फ्लेव्होनॉइड आहे, संपूर्ण शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. करंट मेडिसिनल केमिस्ट्री या जर्नलमध्ये प्रकाशित एक वैद्यकीय पेपर आहे. फ्लेव्होनॉइड्स हा पॉलीफेनॉलचा एक मोठा समूह आहे जो मानवी आहारात मोठ्या प्रमाणावर असतो. क्वेरसेटिनमध्ये आढळणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे ते मधुमेहासह अनेक रोगांवर परिणामकारक करू शकते. अभ्यासकांच्या मते क्वेरसेटिन आणि सल्फर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.

भाज्यांमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म उच्च रक्तदाब कमी करण्यास आणि रक्त गोठण्यापासून संरक्षण करण्यास देखील मदत करतात. त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी कांद्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. या सर्व गुणांमुळे कांदा हृदयरोगी आणि हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

Nepal Travel: नेपाळला भेट देत आहात? मग या खास पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!

सुट्यांमध्ये फिरण्याचा प्लॅन करत आहात? तर महाबलीपुरमची निवड करू शकता; ‘ही’ स्थळे तुमची ट्रीप बनवतील खास

वजन कमी करायचे आहे? तर या ‘पाच’ सवयींना बनवा तुमच्या आयुष्याचा भाग; जाणून घ्या फायदे

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.