Mucor mycosis or Black Fungus | अशाप्रकारे टाळा म्युकोर मायकोसिस संक्रमणाचा धोका; ही घ्या काळजी

रुग्णाच्या शरिरात गंभीर संक्रमण झाल्यास जबडा आणि नाकाची हाड वितळते. रुग्ण वेळेवर बरा होत नसेल तर मृत्यूचाही धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे. (Thus avoiding the risk of mucosal mycosis infection; Take care of this)

Mucor mycosis or Black Fungus | अशाप्रकारे टाळा म्युकोर मायकोसिस संक्रमणाचा धोका; ही घ्या काळजी
अशाप्रकारे टाळा म्युकोर मायकोसिस संक्रमणाचा धोका
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 9:45 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे टेन्शन कमी होत नाही तोच आता म्युकोर मायकोसिस संसर्गाने चिंता वाढवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांत या संसर्गाचे रुग्ण आढळू लागले आहेत. या संसर्गामुळे काहींना प्राण गमवावा लागल्याचीही धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग घ्यावयाच्या काळजीबरोबरच आपल्याला म्युकोर मायकोसिस हा बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठीही सतर्क राहायला पाहिजे. म्युकोर मायकोसिसला ब्लॅक फंगस म्हणूनही ओळखले जाते. याचा नाक, डोळे, मेंदूवर परिणाम दिसून येतो. यात रुग्णाच्या दृष्टीवर आघात होत आहे. फंगल संक्रमणात वाढ होऊ लागल्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. रुग्णाच्या शरिरात गंभीर संक्रमण झाल्यास जबडा आणि नाकाची हाड वितळते. रुग्ण वेळेवर बरा होत नसेल तर मृत्यूचाही धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे. (Thus avoiding the risk of mucosal mycosis infection; Take care of this)

लक्षणे

या आजाराच्या काही लक्षणांमध्ये डोकेदुखी, दातदुखी अशा बऱ्याच लक्षणांचा समावेश आहे.

– डोळे किंवा नाकाजवळ वेदना होणे तसेच आसपासचा भाग लाल होणे – ताप, खोकला – श्वास घेण्यात त्रास – रक्ताच्या उलट्या – अनियंत्रित मधुमेह – स्टेरॉईडमार्फत इम्युनोसुप्रेशन – मानसिक स्थितीमध्ये बदल – दिर्घकाळ आयसीयूमध्ये राहायला लागणे – वोरिकोनाजोल थेरेपी

काळजी कशी घ्याल?

ब्लॅक फंगसवर मात करण्यासाठी पुढील गोष्टींचे पालन करावे लागेल. – हायपरग्लायसीमिया नियंत्रित करा – कोविड-19च्या उपचारातून घरी परतल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी तपासा – स्टेरॉईड घेण्याच्या वेळ आणि डोसवर लक्ष ठेवा – ऑक्सिजन थेरेपी करण्यासाठी जातात पाणी ह्युमिडिफायरसाठी स्वच्छ ठेवा – अँटिबायोटिक्स किंवा अँटिफंगलचा योग्य प्रकारे वापर करा

काय करू नये?

– म्युकोर मायकोसिस संक्रमण गंभीर होऊ नये यासाठी आपल्या विशेष काळजी घ्यावी लागेल. – सतत नाक गळणे यासारखी लक्षणे हलक्यात घेऊ नका – फंगल संक्रमणाचा संशय आल्यानंतर चाचणी करून घेण्यासाठी टाळाटाळ करू नका. कोरोनाइतकेच हे संक्रमण आपल्या जिवावर बेतण्याचा धोका असतो. – म्युकोर मायकोसिसवर उपचार करून घेण्यासाठी वेळ दवडू नका.

अशाप्रकारे म्युकोर मायकोसिस संक्रमणावर मात करता येईल

ब्लॅक फंगसचे संक्रमण रोखण्यासाठी पुढील उपायांचे पालन करा. – जर तुम्ही धुळीचे साम्राज्य असलेल्या परिसरात कामाच्या निमित्ताने जात असाल, तर मास्कचा अवश्य वापर करा. – मातीशी संबंधित कोणतीही कामे करत असाल तर तुमचे शरीर योग्यरित्या झाकले आहे, याची खबरदारी घ्या.

ब्लॅक फंगस अर्थात म्युकोरमायकोसिसचा धोका इम्युनिटी पॉवर कमकुवत असलेल्या लोकांना अधिक आहे. त्यामुळे इम्युनिटी पॉवर कमी होऊ न देणे हे म्युकोर मायकोसिसविरोधात लढण्यासाठी मोठे शस्त्र ठरू शकते. विशेषत: कोविड-19 रोगात रुग्णाला दिली जाणारी स्टेरॉईड आणि औषधे इम्युनिटी पॉवरवर खूप परिणाम करू शकतात. यातूनच आपल्याला ब्लॅक फंगस संक्रमणाचा धोका होऊ शकतो. त्यामुळेच जर तुम्ही कोरोना संसर्गातून बाहेर पडला असाल तर पुढचे कमीत कमी दोन आठवडे तरी तुमच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्यासाठी गरज आहे. (Thus avoiding the risk of mucosal mycosis infection; Take care of this)

इतर बातम्या

PHOTO | एकाच देशाचे दोन क्रिकेट संघ, टीम इंडियाआधी असा कारनामा कोणी कोणी केलाय?

ही सरकारी बँक देतेय स्वस्तात घरं अन् दुकान खरेदीची संधी, 12 मे रोजी लिलाव

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.