ऑटो पार्ट्स बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी 6000 कोटींचा IPO आणणार, तुमच्यासाठी बंपर कमाईची संधी

सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग लिमिटेडला सहा हजार कोटी रुपयांच्या IPO साठी कॅपिटल मार्केट रेग्युलेटरकडून मान्यता मिळाली आहे.

ऑटो पार्ट्स बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी 6000 कोटींचा IPO आणणार, तुमच्यासाठी बंपर कमाईची संधी
आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 11:45 PM

नवी दिल्ली : पीई फर्म ब्लॅकस्टोन-प्रमोटेड ऑटोमोटिव्ह सप्लायर सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग लिमिटेडला सहा हजार कोटी (60,00,00,00,000) रुपयांच्या IPO साठी कॅपिटल मार्केट रेग्युलेटरकडून मान्यता मिळाली आहे. Sona Comstar चा हा IPO ऑटो कंपोनन्ट बनवणाऱ्या कोणत्याही भारतीय कंपनीचा सर्वात मोठा पब्लिक इश्यू असेल. (Sona Comstar receives SEBI nod for Rs 6,000 crore IPO)

सोना कॉमस्टारने फेब्रुवारी महिन्यात आयपीओची प्राथमिक कागदपत्रे सादर केली होती. त्याला सेबी कडून 6 मे रोजी मान्यता मिळाली. सेबीने सोमवारी ही माहिती दिली. या आयपीओसाठी कंपनी 300 कोटी रुपयांचा नवीन शेअर जारी करेल. त्याचबरोबर 5700 कोटी रुपयांचे शेअर्स कंपनीचे प्रमोटर्स आणि विद्यमान गुंतवणूकदार ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे जारी करतील.

या आयपीओमधील 75% समभाग (शेयर) पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIPs – इन्स्टीट्यूशनल बायर्स) साठी आरक्षित असतील. त्याचबरोबर 15% समभाग बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (नॉन-इन्स्टीट्यूशनल इन्व्हेस्टर्स) आणि 10% समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येतील. या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यातील 66 टक्के हिस्सा अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी कंपनी ब्लॅकस्टोनच्या (Blackstone) मालकीचा आहे. तर कंपनीचा 34 टक्के हिस्सा अध्यक्ष संजय कपूर यांच्याकडे आहे.

अमेरिका, युरोपसह चीनमध्ये निर्यात

गुरुग्राममध्ये हेडक्वार्टर असलेली कंपनी एक ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी कंपनी आहे, जी उच्च इंजिनियर, मिशन-क्रिटिकल ऑटोमोटिव्ह सिस्टम, कंपोनन्ट असेंबली, डिफरेंशियल गियर, ट्रेडिशनल आणि मायक्रो-हायब्रिड स्टार्टर मोटर्स सारख्या घटकांचा पुरवठा करते. कंपनी आपली उत्पादने अमेरिका, युरोप, भारत आणि चीनमधील ऑटोमोटिव्ह ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सना पुरवते.

सर्वात मोठी निर्यातदार कंपनी

कंपनी भारतातील स्टार्टर मोटर्सच्या दोन सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे. याशिवाय ते भारतात प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्टर्ससाठी डिफ्रेंशियल गियर्स बनविणारी सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांच्या काही प्रमुख ओईएम ग्राहकांमध्ये अशोक लेलँड, डेमलर, एस्कॉर्ट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, महिंद्रा इलेक्ट्रिक, मारुती सुझुकी, रेनॉ, निसान, वोल्वो आणि वोल्वो आयशर यांचा समावेश आहे.

इतर बातम्या

ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?

Toyota च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन लोकप्रिय गाड्यांबाबत कंपनीचा मोठा निर्णय

Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार

(Sona Comstar receives SEBI nod for Rs 6,000 crore IPO)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.