AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपडे धुतल्याने तुमचे हात कोरडे होतात का ? या उपायांनी हात बनवा कोमल

कपडे धुण्यामुळे अनेकदा लोकांचे हात कोरडे होतात. अशा परिस्थितीत, क्रॅक क्रीमचा वापर करूनही हात मऊ होत नाहीत. मात्र, काही नैसर्गिक उपायांमुळे आपल्या हातातील कोरडेपणा दूर होऊ शकतो.

कपडे धुतल्याने तुमचे हात कोरडे होतात का ? या उपायांनी हात बनवा कोमल
| Updated on: Sep 13, 2022 | 4:02 PM
Share

Tips to make dry hands soft: बहुतांश लोक वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छ- साफ कपड्यांना प्राधान्य देतात. यामुळे कपडे स्वच्छ ठेवणं हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग ठरतो. मात्र रोज कपडे धुण्याचे काही तोटेही असतात. रोज कपडे धुताना वापरलेल्या साबणामुळे आपले हात कोरडे (dry hands) होतात आणि काही वेळेस त्यांना भेगाही पडतात. अशा परिस्थितीत काही साध्या – सोप्या उपायांनी तुम्ही तुमचे हात पुन्हा मऊ आणि कोमल बनवू (soft hands and skin) शकता. कपडे चांगले स्वच्छ निघावेत, म्हणून लोक बऱ्याच वेळेस महागड्या डिटर्जंट पावडरीचा आणि साबणाचा उपयोग करतात. परंतु या उत्पादनांमध्ये असणारी केमिकल्स हातातील नैसर्गिक ओलावा काढून टाकतात. यामुळे हाताची त्वचा कोरडी आणि फाटलेली दिसते. अशावेळी हातांच्या विशेष काळजीसाठी (hand care) काही नैसर्गिक गोष्टींचा (home remedies) वापर करणं तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतं. हात सुंदर आणि मऊ करण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

कोमट पाण्याने हात धुवावे –

कोरड्या व भेगा पडलेल्या हातांसाठी कोमट पाण्याचा वापर करणे चांगले. गार पाण्यामुळे हाताचा ओलावा कमी होतो. मात्र कोमट पाण्यामुळे हाताची त्वचा मऊ होते. यासाठी हात काही वेळ कोमट पाण्यात बुडवून ठेवावेत. नंतर हात स्वच्छ कापडाने नीट पुसून कोरडे करा व त्यानंतर हातांना क्रीम किंवा लोशन लावा.

मॉइश्चरायजर वापरा –

हातांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी एखादे लोशन किंवा मॉइश्चरायजरचा वापर करणे हा चांगला उपाय आहे. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी हात पाण्याने स्वच्छ धुवा व नीट कोरडे करा. नंतर हातांवर क्रीम, लोशन किंवा साय लावून नीट चोळावे. यामुळे तुमचे हात मऊ होतील.

मधाचा वापर करा –

हातांना मॉइश्चरायझ करण्यासाठी तुम्ही मधदेखील वापरू शकता. यासाठी हातावर मध लावा त्यानंतर 15 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने हात धुवा. यामुळे हात पूर्वीपेक्षा मऊ आणि गुळगुळीत झाल्याचे दिसून येईल.

कोरफडीचा रस लावा –

हातांच्या भेगा कमी करण्यासाठी व त्यांचा ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी कोरफडीचा रस किंवा कोरफड जेल वापरणेही उपयुक्त ठरेल. अशावेळी हातावर कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे तुमच्या हातांच्या भेगा दूर होतील आणि तुमचे हात मऊ होतील.

दुधाच्या वापराने हात होतील मऊ –

हाताी त्वचा मऊ ठेवण्यासाठी दुधाचा वापर हाही प्रभावी ठरू शकेल. दुधात असलेले मॉइश्चरायझिंग घटक हातांना मुलायम बनविण्यासाठी साहाय्यक ठरतात . त्यासाठी कोमट दुधात हात बुडवून ठेवा. नंतर १० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने हात धुवा.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.