AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच अनेक आजारांवर ‘करवंद’ गुणकारी !

उन्हाळ्याच्या काळात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. त्यामध्येही सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असल्यामुळे आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागणार आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच अनेक आजारांवर 'करवंद' गुणकारी !
करवंद
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 05, 2021 | 6:59 AM
Share

मुंबई : उन्हाळ्याच्या काळात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. त्यामध्येही सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असल्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये हेल्दी आहार, व्यायाम आणि जास्त पाणी पिणे फायदेशीर आहे. कारण कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात असे काही फळे मिळतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (To boost the immune system Carissa spinarum beneficial)

अशाच एका फळाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. करवंदमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवते. करवंदमध्ये असे काही घटक असतात. त्यामुळे अनेक आजार हे आपल्याापासून दूर राहतात. यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात जास्तीत-जास्त करवंद खा. करवंद फक्त रोगप्रतिाकारक शक्ती वाढवण्यासाठीच नाहीतर अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत.

श्वसन समस्या करवंद खाल्ल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीबरोबरच श्वसनाची समस्या देखील दूर होते. जर आपण करवंदचा रस दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर श्वसनाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. जर आपण करवंदच्या रसात लिंबाचा आणि आल्याचा रस मिसळला तर ते आणखीन फायदेशीर होईल.

अशक्तपणा करवंदमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस इत्यादी खनिजे असतात जे आपल्या शरीराची कमकुवतपणा काढून स्नायूंना बळकट करतात.

सांधेदुखी ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे. अशांनी करवंदाचे सेवन केले पाहिजे. तसेच आपले पाय खूप दुखत असतील तर त्याठिकाणी करवंदाचे पाने चोळा यामुळे काही मिनिटांमध्येच आराम मिळेल.

पित्ताची समस्या पित्ताशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही करवंद खूप प्रभावी आहे. याशिवाय हे नियमित सेवन केल्याने किंवा रस पिल्याने पाचन तंत्र सुधारते आणि गॅस, आंबटपणा, अपचन यासंबंधातील समस्या दूर होतात.

बीपी-कोलेस्ट्रॉल करवंदमधील असलेले खनिज रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात. याशिवाय अशक्तपणा असलेल्या रूग्णांसाठीही हे खूप फायदेशीर आहे. हे हेमोग्लोबिन खूप वेगाने वाढवण्याचे काम करतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(To boost the immune system Carissa spinarum beneficial)

Follow Us
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...