रोगप्रतिकार शक्ती तर वाढवतंच पण आजारांपासूनही वाचवतं, जाणून घ्या Vitamin C चं महत्त्व

व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

रोगप्रतिकार शक्ती तर वाढवतंच पण आजारांपासूनही वाचवतं, जाणून घ्या Vitamin C चं महत्त्व
‘व्हिटॅमिन सी’
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 12, 2021 | 7:15 AM

मुंबई : व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन  सी हाडे, त्वचा आणि रक्तवाहिन्यांसाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सीला एस्कॉर्बिक अॅसिड म्हणून देखील ओळखले जाते. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे आपले शरीर व्हिटॅमिन सी तयार करू शकत नाही, म्हणून आपल्याला आहार आणि खाद्यपदार्थाद्वारे आपल्या शरीरात व्हिटॅमिन घ्यावे लागते. (To boost the immune system Vitamin C is important)

महिलांसाठी व्हिटॅमिन सी ची रोजची गरज 75 मिलीग्राम आहे आणि पुरुषांसाठी 90 मिलीग्राम आहे. जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास आपल्याला अनेक प्रकारचे आजार देखील होऊ शकतात. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून रोगांशी लढण्याची आपली क्षमता सुधारते, हे आपल्याला माहित आहे. परंतु या व्यतिरिक्त व्हिटॅमिन सी बर्‍याच गंभीर आजारांपासून आपला बचाव करण्यास मदत करते.

बर्‍याच अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की व्हिटॅमिन सी रक्तातील यूरिक अॅसिडपातळी कमी करण्यास मदत करते, जो संधिरोगाच्या आजारापासून बचाव करण्यास मदत करते. 46 हजार लोकांवर 20 वर्षांहून अधिक काळ केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन सीमुळे संधिरोगाचा धोका 44 टक्के कमी होतो.

मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, जे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि रोगांशी लढायला मदत करते. म्हणून उन्हाळ्यात मोसंबीचे खाणे चांगले मानले जाते. आता सध्याच्या काळात तर अनेक वेळा डाॅक्टर रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी मोसंबीचे खाण्याचा सल्ला देखील देतात.

मोसंबीचे सेवन केल्यास ब्लड प्रेशरची समस्याही दूर होते. कारण ते शरीर डिटॉक्सीफाई करते आणि मोसंबी खाल्लाने केल्याने आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडते. मोसंबी खाल्लाने गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात होते. कारण मोसंबीमध्ये फायबर आढळते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना गॅस आणि बद्धकोष्ठताची समस्या आहे त्यांनी मोसंबी खाल्ली पाहिजे.

संबंधित बातम्या : 

(To boost the immune system Vitamin C is important)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें